*वसंतराव काळे आयटीआय कॉलेजमध्ये खंडेमहानवमी सोहळा साजरा.*
पंढरपूर/प्रतिनीधी
वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था धोंडेवाडी येथे खंडे नवमी मशिनरी पूजन सोहळा साजरा करण्यात आला .या कार्यक्रम प्रसंगी मा. राहुल भिंगारे साहेब प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कोल्हापूर व संस्थेचे अध्यक्ष मा. कल्याणराव काळे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. कल्याणराव काळे साहेब होते तर प्रमुख प्रमुख उपस्थिती मा. राहुल भिंगारे साहेब होते .
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की सर्वसामान्य ग्रामीण भागातील तरुण विद्यार्थी उद्योजक व्हावा तो स्वतःच्या पायावर उभा राहून सक्षम बनला पाहिजे ,कोणता व्यवसाय छोटा नसतो .या संस्थेतून व्यवसायाचे शिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय उभा करून स्वतःचे व आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करावे तसेच मा. राहुल भिंगारे साहेब म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपली क्षमता व आवड ओळखून त्या क्षेत्रामध्ये कौशल्य संपादन करून स्वतःचा व्यवसाय सुरू केला पाहिजे या व्यवसायासाठी एमआयडीसी मध्ये उद्योग उभारणीसाठी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मा. प्राचार्य संतोष गुळवे यांनी केले या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब काळे संस्थेचे सचिव चंद्रकांत कुंभार वसंतराव काळे प्रशाला चे माजी प्राचार्य शिवाजीराव बागल व हनुमंतराव जमदाडे वसंतराव काळे शैक्षणिक संकुलातील प्राचार्य दादासाहेब खरात, मुख्याध्यापक अनिल कौलगे, मुख्याध्यापक नंदकुमार दुपडे, प्राचार्य सौ.गीतांजली खाडे ,इत्यादी मान्यवर उपस्थित होते .हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व निदेशकांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल ननवरे सर आभार अरुण शिंदे सर यांनी केले यांनी केले.