*ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यी घडवणारे ज्ञानदीप संकुल -- डॉ. जयंत करंदीकर*
करकंब/ प्रतिनिधी :-
नांदोरे येथील ज्ञानदीप प्रोग्रेसिव्ह स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे २०२२-२३ वर्षातील वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ह.भ.प. डॉ. जयंत करंदीकर लाभले होते.तसेच मा. ॲड श्री तानाजीराव सरदार, या.श्री अण्णासाहेब पवार, मा.श्री. विलास साळुंखे, मा. ॲड श्री धनंजय बाबर, मा.श्री सत्यवान माने, मा.श्री. महावीर कदम आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागामध्ये संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यामध्ये ज्ञानदीप प्रोग्रेसिव्ह स्कूल व ज्युनिअर कॉलेज हे अग्रस्थानी आहे. ज्ञानदीप प्रोग्रेसिव्ह स्कूल चे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार ह.भ.प. डॉ. जयंत करंदीकर यांनी यावेळी काढले. यानंतर २०२१-२२ मधील नर्सरी ते बारावी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर नर्सरी ते बारावी च्या विद्यार्थ्यांनी नृत्याचे उत्कृष्ट सादरीकरण केले.यावेळी उपस्थित राजाराम भिंगारे मारुती भिंगारे, सुनील भिंगारे ,युवराज भिंगारे, शरद भिंगारे, नवनाथ नाईकनवरे, नवनाथ पवार,विजयकुमार गुंड ,संताजी नाईकनवरे,कांतीलाल भिंगारे, हरीचंद्र भिंगारे,सत्यवान करांडे ,रामचंद्र वाघ, अभिजीत पाटील,विजय भिंगारे,हरिभाऊ भिंगारे, गणेश जाधव, विजय राऊत,बंडू गणेशकर,अजय डोके,सुनील सातुरे ,वैभव नाईकनवरे संस्थेचे अध्यक्ष श्री . किरण भिंगारे, प्रकल्प संचालक डॉ. श्री गौतम भिंगारे , सचिव श्री उमेश कदम उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सौ. नसरीन तांबोळी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खुप परीश्रम घेतले . कार्यक्रमांचे सुत्रसंचालन नागेश इंगोले व प्रणव भोसले यांनी केले.