*करकंब येथे शिवरत्न शिकालीन मर्दानी आखाड्यात शस्त्रांचे पूजन....!*

*करकंब येथे शिवरत्न शिकालीन मर्दानी आखाड्यात शस्त्रांचे पूजन....!*

*करकंब / प्रतिनिधी

:-सालाबाद प्रमाणे याही वर्षी करकंब येथील शिवकालीन मर्दानी आखाड्यात विजयादशमीच्या (दसऱ्यानिमित्त) शिवकालीन शास्त्राचे पूजन करण्यात आले.

अश्विन शुद्ध नवमी अर्थात खंडे नवमी खंडे चार मूळ शब्द खंडा. खंडा म्हणजे तलवर अर्थात खडग. लढाऊ जमातीसाठी अतिशय महत्त्वाचा हा विजयादशमीचा दिवस. शस्त्रामध्ये शक्तीची अर्थात भवानीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा दिवस म्हणजे खंडे नवमी. खंडे नवमीला शस्त्र पूजा केल्यानंतर  सिमोलंघन करून मोहिमेवर जाण्याची परंपरा होती. म्हणून शस्त्र पूजन केले जाते.
यावेळी या शिवकालीन मर्दानी आखाड्याचे प्रमुख स्नेहदीप व्यवहारे, आनंद उंबरदंड यांच्या हस्ते शस्त्राचे पूजन करून ध्येय मंत्र  व प्रेरणा मंत्र करण्यात आले.