*करकंब येथील न्यू इंग्लिश प्रशालेत विद्यार्थ्यांचे झाले अनोख्या पद्धतीने स्वागत...!* *विद्यार्थी-विद्यार्थिनींना वही व पेन देऊन केले स्वागत.*
करकंब/ प्रतिनिधी:-
चेतना विकास मंडळ संचालित
न्यू इंग्लिश स्कूल करकंब मध्ये चालू शैक्षणिक वर्षाचा प्रवेश उत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष डॉक्टर नितीन खाडे संस्थेचे अध्यक्ष संजीव कुमार म्हेत्रे सर सचिव अविनाश देवकते सर स्कूल कमिटी अध्यक्ष प्रशांत वेळापूरकर तसेच बार्डी गावचे ग्रामस्थ माळी साहेब व मिलिंद काळे व त्यांच्या पत्नी कविता काळे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश उत्सव सन 2020-23 कार्यक्रम आयोजित करण्यात आला .या कार्यक्रमात इयत्ता बारावी परीक्षेमध्ये केंद्रात दुसरा व तिसरी आलेल्या प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी कुमारी श्रद्धा अमोल शेळके व भक्ती आजिनाथ टकले तसेच टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये प्रशालेचा विद्यार्थी यथार्थ देवकते तसेच एटीएस परीक्षेत करकंब केंद्रात प्रथम क्रमांक आलेली प्रशालेचे विद्यार्थिनी कुमारी प्रणिती बळीराम चव्हाण हिचाही सत्कार करण्यात आला. यावेळ नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प ऐवजी वह्या व पेन देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले .या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका करमाळकर मॅडम यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष संजीव कुमार मेहेत्रे सर यांनी यावेळी बोलताना मुलांना भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच या वेळी ग्रामपंचायत सदस्य बापू नाना शिंदे यांनी आपल्या भाषणातून मुलांना शुभेच्छा दिल्या .तसेच स्कूल कमिटी अध्यक्ष प्रशांत वेळापूर कर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम अतिशय उत्साही वातावरणात पार पडला या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते .कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुपरवायझर शिंदे मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन चव्हाण सर यांनी केले.