पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वाळूचोरी विरोधातील कारवाईची मोहीम कायमच सुरू! कासेगावमधून अडीच लाखापेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त,! तर या गुन्ह्यातील चार जणांना अटक
पंढरपूर : प्रतिनिधी
मा. पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम यांनी सोलापुर ग्रा घटकातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे साहेब व पंढरपुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम साहेब यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी स्तरावर अवैध धंद्यावर वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहेच.त्यातीलच एक भाग म्हणून कासेगाव मधून चालू असलेल्या चार वाळू चोरांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून ,यामधील सुमारे अडीच लाख रुपयेपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमालही जप्त केला आहे.
दि 7 जून रोजी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला मिळालेल्या माहितीवरून त्यांचेकडील पथकाने कासेगाव मध्ये चालू असलेल्या चोरून वाळू चोरीवर कारवाई केली . सदर छाप्या मध्ये 1 पिक अप व त्यातील वाळू असा एकूण 2,53,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदची वाळूचोरीबाबत आरोपी नामे 1) सुजित महेश कोळी वय 26वर्ष 2)महाबीर बाबासाहेब गंगथडे वय 24वर्ष 3) ज्ञानेश्वर रविद्र कोळी वय 24वर्ष 4)सुमीत रविद्र कोळी,वय 22वर्ष सर्व रा कासेगाव ता पंढरपुर यांनी संगणमत करून सदरचा गुन्हा केल्याने सदरच्या चारही जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस हवालदार उबाळे हे करत आहेत .
सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधिक्षिक तेजस्वीनी सातपुते मॅडम, अपर पोलीस अधिक्षक मा अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम साहेब पंढरपुर उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक किरण अवचर यांचे नेतृत्वाखाली सपोनि आदिनाथ खरात, पोलीस शिपाई देवेंद्र सुर्यवंषी, पोलीस शिपाई सोमनाथ नरळे यांनी केली आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते मॅडम यांनी जिल्ह्यतील अवैध व्यवसायीक विरोधात कारवाईचे आदेश दिले होते. अशा या आदेशाचे पालन मात्र तालुका पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पो. नि.किरण अवचर यांनी कोणतीही हयगय न करता अनेक अवैध धंद्यावर धाडी टाकून कारवाई केल्याचे मागील अनेक महिन्यापासून पहावयास मिळत आहे. त्यामुळे तालुका पोलीस स्टेशनचे काम वरीष्ठ पातळीवर चांगले असल्याचेच दिसून येत आहे.