*चेतना विकास मंडळ संचलित, न्यू इंग्लिश स्कूल करकंब मध्ये फुले -आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात*
करकंब/ प्रतिनिधी
:-येथील चेतना विकास मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांती ज्योती महात्मा फुले जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. या सप्ताहातील पहिले पुष्प सुरेश शिंदे दिलीप साबळ यांनी गुंफताना महात्मा फुले यांचे विचार मुलांपुढे मांढले. या सप्ताहातील दुसरे महत्त्वाचे पुष्प विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडक यांच्या जयंती दिवशी अनगर केंद्राचे केंद्रप्रमुख महादेव माने यांनी गुंफले तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गौतम शिंदे व यांच्या विजया लक्ष्मी शिंदे उपस्थित होते. यावेळी बोलताना गौतम शिंदे यांनी गुरु-शिष्य परंपरा सांगत असताना द्रोणाचार्य आणि एकलव्याचे उदाहरण दिले. यावेळी प्रमुख वक्ते माने साहेब यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रमुख घटनांचा विद्यार्थ्यांपुढे आदर्श ठेवला.मुलांनी शिकले पाहिजे व्यसनापासून दूर राहिले पाहिजे . पुस्तकांशी मैत्री*केले पाहिजे. आपल्या ज्ञानामध्ये वाढ केली पाहिजे असे महत्वपूर्ण विचार त्यांनी यावेळी मांडले . कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष संजीवकुमार म्हेत्रे सर, स्कूल कमिटी अध्यक्ष वेळापूर सर ग्रामपंचायत सदस्य बापुनाना शिंदे. रेखा गायकवाड. प्रशालेच्या पर्यवेक्षिका .शिंदे मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मुलांसाठी फुले - आंबेडकर जीवनावर वस्तुनिष्ठ परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचे कामकाज प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक उंबरजे सर व चव्हाण सर यांनी परीक्षा पार पडली व त्यास सर्व शिक्षकांनी सहकार्य केले या परिक्षेत 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सदर परीक्षेसाठी प्रथम पाच क्रमांकांना सन्मानचिन्ह व रोख स्वरूपात बक्षीस दिले जाणार आहे. यावेळी करकम केंद्राचे केंद्रप्रमुख श्री माळी सर व जाधव वाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गोरे गुरुजी यांनी या कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली व प्रशालेचे कौतुक केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका करमाळकर यांनी केले. व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव अविनाश देवकते यांनी केले.