*करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल चे स्पर्धा परीक्षांमध्ये सुयश......!*
करकंब प्रतिनिधी :-
ए. टी .एस. प्रज्ञाशोध राज्यस्तरीय परीक्षांमध्ये, रामभाऊ जोशी हायस्कूल, करकंबच्या इयत्ता 5वीच्या विद्यार्थिनींनी यश प्राप्त केलेले आहे.
*1) कु, स्वरा विशाल रेपाळ (जिल्ह्यात 6वी व राज्यात 13 वी)*
*2) कु, गार्गी हेमंत कदम (केंद्रात द्वितीय)*
*3) कु, पूर्वा आदिनाथ देशमुख (केंद्रात पाचवी)*
या यशस्वी विद्यार्थ्यांना ए टी एस प्रज्ञाशोध परीक्षा प्रमुख शिक्षक - मनीषा ढोबळे मॅडम, संजय पाटील सर, अभिषेक चोपडे सर व वर्गशिक्षक - महादेव पुजारी सर यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व यशस्वी विद्यार्थांचे दयानंद शिक्षण संस्था, सोलापूर चे स्थानिय सचिव - महेश चौप्रा साहेब , प्रशासकीय अधिकारी डॉ. विजयकुमार उबाळे सर, प्रशालेचे प्राचार्य -हेमंत कदम,पर्यवेक्षक - धनवंत करळे सर, शालेय शैक्षणिक सल्लागार समितीचे सर्व सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.