*सामान्य लोकांना मानसिक आधार देण्याचे काम शिवसैनिकांचे- संभाजीराजे शिंदे* * करकंब येथे शिवसंपर्क अभियानाची सुरुवात*
करकब /प्रतिनिधी
– राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशाने गेल्या अठरा महिन्याच्या कालावधीमध्ये कोविड काळामध्ये सर्व सामान्य तळागाळातील लोकांना शासकिय सुविधा पोचल्यात का तसेच प्रत्येक गावात सर्वसामान्य जनतेशी संपर्क साधून घराघरात, मनामनात गाव तिथे शिवसेना शाखा व घर तिथे शिवसैनिक हा संकल्प मनात घेऊन यापुढील काळात सामान्य लोकांना मानसिक आधार देण्याचे काम या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसैनिकांनी करावे असे मत पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांनी व्यक्त केले.
करकंब येथे मोठया उत्साहात व धुमधडाक्यात कोरोना नियमाचे पालन करुन शिवसंपर्क अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी तालुका प्रमुख महावीर देशमुख, उपतालुका प्रमुख संतोष धोत्रे, कल्याण कवडे, विभाग प्रमुख उमेश काळे, प्रशांत जाधव, युवासेना उपतालुका प्रमुख रणजित कदम, शिवसेना शहर अध्यक्ष दत्ता पेठकर, यशवंत बडेकर, उपशहर प्रमुख दत्ता शिंदे, युवासेना शहर प्रमुख सचिन मोरे, शाखाप्रमुख गणेश कदम, अनिल पवार, पांडुरंग परदेशी, रविंद्र पेठकर, ऋषिकेश कवडे, ग्रा.पं.सदस्य बापू शिंदे, नागेश गायकवाड, धनाजी घाटूळे, अनिल पवार, महेश पवार, विजय शिंदे, रतिलाल कोळेकर, सरपंच सदाशिव शेळके, रघुनाथ शेळके, आप्पाराव शेळके, शिवाजी देशमुख, वासुदेव माळी, दत्तात्रय शेळके, कुमार शेळके, डॉ.नवनाथ शिंदे, शुभम चव्हाण, ग्रा.पं.सदस्य पांडुरंग देशमुख, अण्णा शेळके, अमित बोबडे, भास्कर देशमुख, लक्ष्मण शेळके, युवा उद्योजक मोहन शिंगटे, संदिप शिंगटे आदिसह शिवसैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढे बोलताना शिवसंपर्क अभियानातून करकंब जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण, करकंब परिसर तसेच वाडीवस्तीवर गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक हि संकल्पना घेऊन तालुका प्रमुख, गट प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांना सोबत घेऊन शिवसैनिक नोंदणी करून या भागात किती टक्के लसीकरण झाले आहे याबाबतची माहिती घेऊन तसेच माननीय मुख्यमंत्री यांनी गेल्या अठरा महिन्यामध्ये ज्या शासकीय योजना राबविलेल्या आहेत त्या योजना तळागाळात पोचविण्याच्या भूमिका शिवसेना व शिवसंपर्क अभियान या माध्यमातून करुन तसेच शिवसेना युवा सेना, महिला आघाडी, शाखा स्थापन करण्यात येणार असून प्रत्येक गावातील पदाधिकाऱ्यांनी त्या त्या गावातील लेखी स्वरुपाच्या समस्या माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे मांडायच्या आहेत. सर्व सामान्यांना न्याय व आधार मिळेल या भुमिकेनेच या शिवसंपर्क अभियानातून काम करणार असल्याचे जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे सांगितले.