*विद्यार्थ्यांनी दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन करावे – प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे*

*विद्यार्थ्यांनी दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन करावे – प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे*


पंढरपूर / प्रतिनिधी

वनस्पती हा निसर्ग चक्रातील महत्त्वाचा घटक आहे.सजीव प्राण्याच्या  जीवनासाठी वनस्पतीचा आहार व औषधी कारणासाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. निसर्गामध्ये मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे अनेक दुर्मिळ वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन केले पाहिजे.” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे यांनी केले. 
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र  विभागाच्या वतीने आयोजित ‘दुर्मिळ वनस्पती छायाचित्र प्रदर्शना’त अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर उपप्राचार्य डॉ. लतिका बागल या उपस्थित होत्या.  
प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे पुढे म्हणाले की, “वनस्पतीशास्त्र विषयाची पदवी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना अध्यापन क्षेत्राशिवाय इतर ठिकाणी खूप चांगल्या संधी आहेत. औषधी वनस्पती, फळ वनस्पती, फुल वनस्पती यांच्यावर काम करण्याची संधी आहे. अनेक वनस्पती ह्या काळाच्या ओघात नष्ट होत आहेत. त्या वनस्पतींची पर्यावरणाच्या संवर्धनात महत्त्वाची भूमिका असते. नवनवीन प्रजातींचा शोध लावला पाहिजे. जुन्या असणाऱ्या वनस्पतींचे औषधी महत्त्व अधोरेखित केले पाहिजे.”
 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रोफे. डॉ. मारुती सातपुते यांनी केले. यावेळी डॉ. नवनाथ पिसे, प्रा. भाग्यश्री नाईकनवरे, प्रा. शिवाजी बागल, प्रा. निलेश पाटील, प्रा. अनिकेत चंदनशिवे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रियांका बनकर यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. सचिन थिटे यांनी मानले.
...............................................................................................................................................................................................................................