*महर्षी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त रामभाऊ जोशी हायस्कूल येथे आरोग्य विषयी मार्गदर्शन.* *सॅनिटरी पॅड ज्वलन मशीन ची भेट.* *रोटरी क्लब, पंढरपूर चा उपक्रम.*

*महर्षी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त रामभाऊ जोशी हायस्कूल येथे आरोग्य विषयी मार्गदर्शन.*  *सॅनिटरी पॅड ज्वलन मशीन ची भेट.*   *रोटरी क्लब, पंढरपूर चा उपक्रम.*

करकंब /प्रतिनिधी :-
रोटरी क्लब पंढरपूर यांच्या वतीनेआज दिनांक- 24/ 3 /2023 रोजी महर्षी दयानंद सरस्वती यांच्या 200व्या जयंती शुभारंभ वर्षा निमित्त रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब येथे आरोग्य विषयक मार्गदर्शन माहिती व सॅनिटरी पॅड ज्वलन मशीन रामभाऊ जोशी हायस्कूल देण्यात आले, यावेळी रोटरी क्लब पंढरपूरचे अध्यक्ष प्राचार्य -  कैलास कंराडे सर , रोटरी क्लब पंढरपूर चे  मिलिंद वंजारी , रोटरी क्लब करकंब चे अध्यक्ष- रघुनाथ जाधव  यांच्या उपस्थितीत सदर मशीन देण्यात आली, यावेळी संस्थेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा हार पुष्पगुच्छ व सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला,
          सदर कार्यक्रमात रोटरी क्लब व आरोग्य विषयी व मशीन बद्दल संपूर्ण माहिती मिलिंद वंजारी यांनी दिली, रघुनाथ जाधव  यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.  व  बाबुराव  जाधव यांनी संस्थेच्या वतीने रोटरी क्लब, पंढरपूर चे आभार मानले.
        सदर कार्यक्रमास शैक्षणिक सल्लागार समितीचे  बाबुराव जाधव, लक्ष्मण वंजारी,  अमर चव्हाण,  संजय मोहिते ,  मारुती व्यवहारे सर, पत्रकार -मनोज पवार व मुख्याध्यापक हेमंत कदम यांच्यासोबत सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थितीत होते.