*पंढरपूर येथे प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने आनंदत्सोव साजरा....!*
करकंब/ प्रतिनिधी:-
माजी राज्यमंत्री व आमदार बच्चुभाऊ कडू यांची दिव्यांग मंत्रालयाच्या प्रमुख पदी निवड करून आमदार बच्चुभाऊ कडू यांना मंत्रिपदाचा दर्जा दिल्याबद्दल पंढरपूर शहर व तालुका यांच्यावतीने लाडू वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
पंढरपूर येथे दिनांक 28/0 5 /2023 रोजी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना पंढरपूर तालुका व शहर यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये अपंग बांधवांच्या अंत्योदय रेशन कार्ड संबंधित चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना पेन्शन संदर्भात सविस्तर चर्चा करून त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी रणनीती करण्यात आली. त्याचबरोबर दिव्यांगाचा पंचायत समिती चा व ग्रामपंचायतचा 5% निधीमध्ये तफावत असल्याची निदर्शनास आले .यावेळी गटविकास अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून राहिलेल्या सर्व ग्रामपंचायत चा निधी वाटप करण्यात भाग पाडण्यात येईल. असे तालुकाध्यक्ष उमेश गोडसे व शहराध्यक्ष गणेश ननवरे यांनी उपस्थितांना सांगितले त्याचबरोबर नगरपालिकेतील पाच टक्के निधी व वाटप करण्यात आलेला निधी यामध्ये सुद्धा मोठा फरक असल्याचे प्रहार सैनिकाकडून सांगण्यात आले. या सर्व विविध प्रश्नावर चर्चा करून शेवटी दिव्यांग मंत्रालयाचे प्रमुख अपंगाचे दैवत माजी राज्यमंत्री आमदार- बच्चू भाऊ कडू यांची दिव्यांग मंत्रालयाच्या प्रमुख पदी निवड करून त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला. त्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री- एकनाथराव शिंदे व मा. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री, गृहमंत्री- देवेंद्र फडवणीस आणि आमदार- बच्चुभाऊ कडू यांचे अभिनंदन ठराव एकमताने मंजूर करून उपस्थित दिव्यांग बांधवांना लाडू वाटप करण्यात आले. व अल्पोपहार देण्यात आला. माजी राज्यमंत्री व आमदार- बच्चू भाऊं कडू यांच्या नावाचा जयघोष यावेळी करण्यात आला .व त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा प्रकारची पांडुरंग चरणी उपस्थित दिव्यांगांनी प्रार्थना केली. या कार्यक्रमास प्रमुख म्हणून जिल्हा सचिव संजय जगताप , जिल्हाध्यक्ष दत्ता चौगुले,कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका प्रमुख उमेश गोडसे शहर प्रमुख गणेश ननवरे महिला शहरप्रमुख सरिता माने. ज्ञानेश्वर गायकवाड, बाळू पेटकर, प्रकाश शिंदे, जाधव आदीसह पंढरपूर शहर व तालुक्यातील मोठ्या संख्येने बांधव-भगिनी यावेळीउपस्थित होते.सर्वांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.