*करकंब नगरीत नाशिक सायकल वारीचे भव्य स्वागत करण्यात येणार* *नाशिक सायकलिस्ट करकंब गावच्या लेकीचं झाड टीम व जागर स्वच्छता अभियान टीमच्या वतीने वृक्षारोपण करण्यात येणार*
करकंब/ प्रतिनिधी :-
नाशिक येथून विठूरायाच्या दर्शनाच्या ओढीने आणि पर्यावरणाचा व स्वच्छतेचा संदेश घेऊन येणारी सायकल वारी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून येणाऱ्या सायकलिस्ट वारीच स्वागत करकंब गावच ग्रामदैवत कनकंबा माता मंदिर येथे आयोजित करण्यात आले असून त्यांच्या शुभहस्ते करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान अंतर्गत वृक्षारोपण करण्यात येणार आहे.आपल शरीर फिट तर सर्वकाही हिट ही भावना सायकल स्वारांची आहे त्यामुळे सर्वांगसुंदर व्यायाम होतो.शरिर स्वास्थ्य निरोगी राहते,या वारीमध्ये लहान मुलांपासून वयस्कर व्यक्ती सामील झालेल्या असून ४००-५००किलोमिटरचा प्रवास या वारीमधून होतोय.जवळ जवळ १५०० सायकलिस्ट या वारीत सहभागी झाले आहेत.नादब्रह्म कला फाउंडेशन वतीनं सरबत वाटप करण्यात येणार असून करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम व जागर स्वच्छता अभियान टीम, करकंब ग्रामस्थ यासाठी आतुर आहेत सर्वांनी कनकंबा माता मंदिर येथे ४वा.वेळेत उपस्थित रहावे उपस्थित राहावे हि विनंती.