*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी कल्याण काका आखाडे यांची निवड.....!*
.करकंब/ प्रतिनिधी
:-सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष-कल्याण काका आखाडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.
कल्याण काका आखाडे यांच्या राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडीबद्दल पंढरपूर तालुक्याचे अध्यक्ष- तुकाराम माळी ,युवा नेते - महेंद्र माळी, ग्रामपंचायत सदस्य- शिवाजी माळी, बंडू राऊत लखन पवार, ज्योतीराम सरडे, राजाराम माळी परिसर पंढरपूर सावता परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत विशेष सन्मान व सत्कार करण्यात आला. कल्याण काका आखाडे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पंढरपूर तालुक्यासह करकंब करकंब व परिसरात आनंदोत्सव व चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे.