*कुर्डुवाडी येथे भाजपची बूथ सशक्तीकरण अभियान बैठक संपन्न,*

*कुर्डुवाडी येथे भाजपची बूथ सशक्तीकरण अभियान बैठक संपन्न,*


करकंब /प्रतिनिधी:-
माढा लोकसभा मतदारसंघाचे अभियान संयोजक जयकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व  धैर्यशील भैय्या मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्रिमूर्ती हॉटेल कुर्डुवाडी येथे हर घर तिरंगा व बूथ सशक्तीकरण या साठी बैठक संपन्न झाली,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आणि राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रसाद नड्डा यांच्या संकल्पनेतून सम्पूर्ण भारतामध्ये बूथ मजबूत व्हावेत,यासाठी बूथ सशक्तीकरण अभियान राबवले जात आहे,त्याविषयी सर्व कार्यकर्त्यांना त्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले,प्रखर राष्ट्रवाद प्रत्येकामध्ये जागृत व्हावा व देश 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना प्रत्येकाच्या घरासमोर राष्ट्रध्वज तिरंगा फडकवला जावा,याचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करा,याविषयी पण मार्गदर्शन या बैठकीत करण्यात आले,याप्रसंगी
शरद झेंडे विस्तारक,तालुकाध्यक्ष योगेश बोबडे तालुका सरचिटणीस दत्तात्रय मोरे युवा मोर्चा अध्यक्ष उमेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष भारत नाना पाटील संघटन सरचिटणीस जयसिंग आप्पा ढवळे व तालुक्यातुन पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,कार्यक्रमाचे प्रास्तविक योगेश बोबडे यांनी केले तर  मा जयकुमार शिंदे ,मा,धैर्यशील मोहिते पाटील,यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय मोरे यांनी केले.