*देशपातळीवरील ऑलिंपियाड परिक्षेमध्ये एस. पी. स्कूलचे घवघवीत यश*  

*देशपातळीवरील ऑलिंपियाड परिक्षेमध्ये एस. पी. स्कूलचे घवघवीत यश*  

करकंब /प्रतिनिधी :-

ई.एच.एफ फाउंडेशन, नवी दिल्ली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या गणित, विज्ञान व इंग्रजी विषयांच्या ऑलिंपियाड स्पर्धेमध्ये एस.पी. पब्लिक स्कूल, नांदोरे या प्रशालेमधील विद्यार्थ्यांनी 17 सुवर्ण, एक सिल्वर व एक ब्रांझपदक मिळवून घवघवीत यश संपादन केले. 
यामध्ये अनिरुद्ध गायकवाड, अथर्व गायकवाड, वेदांत वलगे, विनीत शिंदे, संचिता फाळके, श्रेया काटकर ,राजवर्धन भोसले ,आर्यन गादिया, अनुज देशपांडे ,अमरजा ननवरे, प्रथमेश पाटील या विद्यार्थ्यांनी सुवर्ण व  मनस्वी खळगे या विद्यार्थिनीने सिल्वर पदक मिळवून यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ, सहसचिव बाळासाहेब चव्हाण, खजिनदार विक्रम भिंगारे ,प्रकल्प संचालिका वासंती वलगे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण यांनी केले.
 यशस्वी विद्यार्थ्यांना कादर मुलाणी, अमरनाथ इंगोले, शहाजी साठे, रामचंद्र सावंत, अमोल तेली,सिमा पिसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.