*अखेर ... करकंब येथील पांढरे वस्ती झेडपी शाळेत शिक्षकाची नेमणूक....!*  *गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी गैरव्यवहार प्रकरणी दिले चौकशीचे आदेश.* *करकंब च्या झेडपीच्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ.*

*अखेर ... करकंब येथील पांढरे वस्ती झेडपी शाळेत शिक्षकाची नेमणूक....!*   *गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी गैरव्यवहार प्रकरणी दिले चौकशीचे आदेश.*  *करकंब च्या झेडपीच्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ.*

करकंब प्रतिनिधी   :

- करकंबच्या जि. प.प्राथमिक शाळा पांढरे वस्ती येथील शाळेतील शिक्षक नियमबाह्य पद्धतीने बदली केल्यामुळे संतप्त झालेल्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मल्हारी मदने व पालक यांच्यासमवेत करकंबचे उपसरपंच आदिनाथ देशमुख व ॲड.शरदचंद्र पांढरे यांनी पंढरपूर पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रशांत काळे  यांना गटशिक्षण अधिकारी महारुद्र नाळे यांच्याविरोधात व गटशिक्षणाधिकारी यांनी नियमबाह्य पद्धतीने व गैरव्यवहार करून तेथील शिक्षकाची बदली केली आहे, त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. व पांढरे वस्ती शाळेला ताबडतोब शिक्षक मिळावा. या संबंधी निवेदन दिले, यावेळी वरिष्ठांशी बोलणे केल्यानंतर पांढरे वस्ती शाळेला एक शिक्षक मंजूर केलेला आहे .तो शिक्षक आज या पांढरे वस्ती झेडपी शाळेत हजर होईल. व पांढरे वस्ती जिल्हा परिषद  शाळेतील शिक्षकांची बदली करताना गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांनी कोणाचे सांगणे वरून किंवा कोणत्या कारणास्तव बदली केली आहे,याची चौकशी करण्याचे आदेश गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांनी दिले आहेत.
शिक्षका विना शाळा भरत असल्याने  तोपर्यंत का होईना शिक्षक मिळाला याचा मोठा आनंद या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांढरे वस्ती  पाल्यातून व पालक वर्गातून होत आहे.
शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांनी कोण .. कोण ..कोणत्या गट शिक्षकाबरोबर व्यवहार केले आहेत. याबाबतच्या चौकशीचे आदेश गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी दिल्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.