*महिलेचा विनयभंग व पतीस मारहाण प्रकरणी आरोपीस सश्रम कारावास*
करकंब(प्रतिनिधी) :-
पंढरपूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारीसो श्रीमती आर. जे. कुंभार यांनी दि १७ फेब्रुवारी रोजी फिर्यादीस विनयभंग केल्याप्रकरणी व फिर्यादीचे पतीस कोयत्याने मारून जखमी केल्या प्रकरणी आरोपी शहाजी भिमराव गायकवाड रा. करोळे तालुका पंढरपूर यास सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
यात हकिगत अशी की, यातील फिर्यादी हि तिच्या घरी दिवाण वर झोपून टी. व्ही. पाहत असताना यातील आरोपी शहाजी भिमराव गायकवाड रा. करोळे ता. पंढरपूर याने फिर्यादीस तु मला फार आवडते असे म्हणुन फिर्यादीस मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले आहे. त्यावेळी फिर्यादीचा पती तेथे आला असता त्यांना शिवीगाळी, दमदाटी करून आरोपीने त्याचे हातातील ऊस तोडणीचे कोयत्याने फिर्यादीच्या डावे हातावर व उजवे पायाचे गुडघ्यावर मारून किरकोळ व गंभीर जखमी केले होते. त्यावरून करकंब पोलीस स्टेशन येथे भा.द.वि. कलम ३२६, ३५४,३५४ अ, ४५२, ३२४, ५०४, ५०६ शस्त्र अधिनियम ४,२५ सह महा. पो.अधि. कलम १३५ प्रमाणे आरोपी शहाजी भिमराव गायकवाड रा. करोळे याच्या विरुध्द फिर्याद दिली होती. सदर गुन्हयाचा तपास करून उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉ. बी.के.मोरे यांनी यातील आरोपी विरूध्द मा. कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदर खटल्यात सरकारी वकील एम.एम. पठाण यांनी सरकार पक्षातर्फे ८ (आठ) साक्षीदार तपासले आहेत. सदर साक्षीदारांचे जबाब व सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राहय धरून मा. न्यायालय में कोर्ट पंढरपूर यांनी आरोपीस भा.द. वि.कलम ३२६,३५४,३५४ अ, ४५२, मध्ये दोषी धरून आरोपीस भा.द.वि. कलम ३२६ मध्ये १ वर्ष सश्रम कारावास व १ हजार रूपये दंड, भा.द.वि. कलम ३५४ मध्ये ६ महिने सश्रम कारावास व १ हजार रूपये दंड,भा.द.वि.कलम ३५४ अ मध्ये ३ महिने सश्रम कारावास व भा.द.वि. कलम ४५२ मध्ये ३ महिने साधी कैद व ५००/- रूपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सदर खटल्यात कामकाज करतेवेळी कोर्ट ऑर्डली म्हणुन पोलीस कॉ.अमोल लोकरे व कोर्ट पैरवी म्हणून सहा. फौजदार रावसाहेब वाघमारे यांनी कामकाज पाहीले.