*ज्ञानदीप प्रोग्रेसिव्ह स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज मध्ये दिपोत्सव साजरा*
करकंब /प्रतिनिधी
जयहिंद प्रतिष्ठान नांदोरे संचलित ज्ञानदीप प्रोग्रेसिव्ह स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज मध्ये दिवाळी सणानिमित्त दिपोत्सव साजरा करण्यात आला. दिवाळी हा प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो. आणि याच दिवाळी सणाची माहिती सर्व विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी शाळेमध्ये हा दिपोत्सव साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना दिवाळी सणानिमित्त माहिती देण्यात आली. तसेच खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष किरण भिंगारे ,उमेश कदम ,प्रदीप माळी ,अमोल मस्के ,कुंडलिक तळेकर, दिपाली थिटे , सागर चव्हाण ,वंदना देशपांडे, विश्वास जवळेकर,नागेश इंगोले, विनोद पिसे मुख्याध्यापिका नसरीन तांबोळी , प्रियांका आमसुले , अनिता साबळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

दिपोत्सव साजरा करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.