*पटवर्धन कुरोली भीमा नदीवर नवीन पूल उभारण्यासाठी प्रयत्नशील* *आ. बबनराव शिंदे - पटवर्धन कुरोली येथे नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन*
पंढरपूर -/प्रतिनिधी
नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे पटवर्धन कुरोली गावासह वाड्यावास्तवरील एकही कुठुंब स्वछ पाण्यापासून वंचित राहणार नसून बंद पाईपलाईन व नळाद्वारे घरोघरी शुद्ध पाणी मिळणार असल्याने ग्रामस्थांना त्याचा फायदा होईल. पटवर्धन कुरोली भीमा नदीवर वाहतूकीसाठी स्वतंत्र पूल उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही आ बबनराव शिंदे यांनी.
जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजने अंतर्गत पटवर्धन कुरोली ता पंढरपूर येथे 84 लाख रुपय खर्चाच्या योजनेचे भूमिपूजम शुभारंभ आ बबनराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन उपासे होते यावेळी विठ्ठलचे माजी संचालक उत्तम नाईकनवरे, नंदकुमार पाटील, पोपट चव्हाण, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष मोहन अनपट, घनशाम काटकर, धैर्यशील नाईकनवरे, सरपंच प्रियांका नाईकणावरे, उपसरपंच शैलजा तवटे, माजी सरपंच गणेश उपासे, ऍड पांडुरंग नाईकणावरे, विष्णू मोरे, भागवत उपासे, पंढीत तवटे, धर्मारज काटकर, दीपक पाटील, दादा साखरे, शाखा अभियंता साई देशमुख ग्रामविकास अधिकारी चंद्रशेखर गिड्डे, दादा तोडकरी. प्रशांत मोरे, शिवाजी नाईकणावरे आदी उपस्थित होते. यावेळी आ.बबनराव शिंदे यांनी जुनी 40 वर्षांपूर्वीची योजना खराब झाल्यामुळे काही ठिकाणी पाण्याच्या समस्या निर्माण होत होत्या. आता नवीन होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेमुळे स्वतंत्र पाईपलाईन टाकून घरोघरी व वाड्यावस्त्यांवर शुद्ध पाणीपुरवठा केला जाणार आहे. यासाठी गावातील कोंक्रेट रस्ते फोडावे लागतील मात्र ते पुन्हा नव्याने बनविले। जातील. जुनी जीर्ण झालेली पाण्याची टाकी पाडून नवीन जास्त क्षमता असणारी टाकी बनविली जाणार आहे. मात्र काम करणाऱ्या थेकेदारांकडून कामाचा दर्जा राखला जाईल याची खबरदारी ग्रामपंचायतीने घ्यावी असे सांगितल.
याशिवाय वांधाऱ्याकडं जाणाऱ्या रस्त्याला निधी उपलब्ध करू, पुलाच्या कामासाठी शासनदरबारीं प्रयत्न करू, डिपीडीशी मधून भागीरथ योजनेसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून शेतीच्या विजेच्या तक्रारी आहेत. शेतकरी उपोषणाला ही बसले आहेत. त्याचा विचार करून mseb ची क्षमता वाढवून स्वतंत्र लाईन टाकणार, कनॉल पट्टी रस्त्याच्या कामासाठी निधी दिला जाईल उसाच्या समस्या दूर करून चांगला भाव देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी माजी उपसरपंच पांडुरंग नाईकनवरे यांनी यापूर्वी अनेक योजना मिळाल्या असल्या तरी भीमा नदीवरील नवीन पुलासाठी निधी निळावा, वाड्यावस्त्यावर भागीरथ योजना सुरु करावी, उर्वरित रस्त्यांसाठी निधी द्यावा आशी मागणी केली प्रस्ताविक ऍड पांडुरंग नाईकनवरे यांनी केले ल सूत्रसंचालणं सुग्रीव कोळी यांनी केले तर आभार गणेश पिंजारी यांनी मानले.
फोटो... पटकुरोली येथे पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा भूमिपूजन शुभारब करताना आ बबनराव शिंदे, सरपंच प्रियांका नाईकनवरे, उत्तम नाईकनवरे, नंदकुमार पाटील, मोहन उपासे आदी