*मातंग समाजाच्या प्रश्नांकडे   दुर्लक्ष करणाऱ्या मस्तवाल सत्ताधाऱ्यांना वेसण घाला - प्रा डॉ मच्छिंद्र सकटे*

*मातंग समाजाच्या प्रश्नांकडे   दुर्लक्ष करणाऱ्या मस्तवाल सत्ताधाऱ्यांना वेसण घाला - प्रा डॉ मच्छिंद्र सकटे*

पंढरपूर:-प्रतिनिधी

" गेल्या काही वर्षांत मातंग समाजावर अमानुष अत्याचार होत आहेत. मेल्यानंतर प्रेत जाळायला मातंग समाजाला स्मशानभूमी नाही. मातंग समाजाची अस्मिता असणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यालाही जागा नाही. मातंग समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही. म्हणूनच मातंग समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या या मस्तवाल सत्ताधाऱ्यांना वेसण घातली पाहिजे" असे विचार प्रा डॉ मच्छिंद्र सकटे यांनी आज मुंबईतील मरोळ येथील महिला मेळाव्यात व्यक्त केले.अध्यक्षस्थानी दलित महासंघाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रा पुष्पलता सकटे होत्या.
       या महिला मेळाव्यात बोलताना प्रा पुष्पलता सकटे म्हणाल्या की," मातंग समाजातील स्त्रियांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. शिक्षणा शिवाय आपला उध्दार होणार नाही हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे"
    दलित महासंघाच्या वतीने अंधेरी पूर्व भागात मरोळ येथील पंचशील नगर मध्ये महीला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्यामध्ये ' लाठी 'कार  विजयकुमार सूर्यवंशी, लाहुआबा थोरात, सुखदेव कोंगे, अरुणा सोनवणे,पुष्पा सुर्यवंशी, उषाबाई नामवाड, गंगा वाघमारे यांची भाषणे झाली. अनेक स्त्रियांनी आपले प्रश्न मांडले. या मेळाव्याला दलित महासंघाचे राज्य सरचिटणीस शंकर महापुरे तसेच हरिष सातपुते ही उपस्थित होते.
    दलित महासंघाच्या वतीने आयोजित केलेल्या या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मंगल सोनावणे यांनी सर्वांचे स्वागत केले. फातिमा शेख यांनी प्रस्तावना केली. विजय चव्हाण यांनी आभार मानले.