*न्यू इंग्लिश स्कूल करकंब येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी*. . **सीमा बाळासाहेब घाडगे यांना सावित्रीबाई फुले हिरकणी पुरस्काराने सन्मानित**
करकंब /प्रतिनिधी
चेतना विकास मंडळ संचलित, *न्यू इंग्लिश स्कूल करकंब* या प्रशालेमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती साजरी करण्यात आली.
या निमित्ताने करकंब येथील प्रतिबिंब सांस्कृतिक मंच करकंब च्या संचालिका सीमा बाळासाहेब घाडगे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी स्वर्गीय दत्तात्रेय खारे प्रतिष्ठानचे प्रमुख सतीश खारे. व शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष नितीन खाडे व पत्रकार लक्ष्मण जाधव व संस्थेचे सचिव देवकते सर स्कूल कमिटी अध्यक्ष संजीवकुमार म्हेत्रे सर व मुख्याध्यापिका करमाळकर मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी करकंब परिसरामध्ये संस्कार व शारीरिक व्यायामाचे बीजे रोवणाऱ्या व शिवकालीन मर्दानी खेळाची ओळख करून देणाऱ्या व अनेक मुला/मुलींना घडवणाऱ्या सौ सीमा बाळासाहेब घाडगे यांना सावित्रीबाई फुले हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल करकंब व परिसरातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.