* वाढदिवसाला नाही कमी.... इथे मात्र बेरोजगारांची हमी......*.! *करकंब परिसरात वाढदिवस साजरा करून मुख्य प्रश्नाला दिली जातेय बगल* * युवकांनी सावध होण्याची गरज *
करकंब/ प्रतिनिधी :
करकंब व परिसरामधे राजकीय नेत्यांनी गेल्या वर्षीपासून अनेक युवकांचे वाढदिवसानिमित्त सत्कार करण्याचे प्रमाण वाढले असून असे सत्कार करून युवकांचे मुख्य प्रश्नाला बगल देण्याचे काम सुरु असल्याची चर्चा जबाबदार नागरिक करीत आहेत.
करकंब हे गाव पंढरपूर तालुक्यातील लोकसंख्येच्या तुलनेत सर्वात मोठे गाव आहे.
अनेक युवक डिग्री घेऊन बेरोजगारचे जीवन जगत आहेत. या भागातील पुढारी व नेते या युवकांना रोजगार मिळावा त्यांचे जीवन सुकर व्हावे, असा प्रयत्न न करता बेरोजगारीवरुन युवकांचे लक्ष हटविण्यासाठी त्यांचे वाढदिवस साजरा करून क्षणीक काळासाठी भुलवत असताना दिसत आहेत.
अलिकडे कोणत्याही युवकाचा वाढदिवस असला की त्याचेघरी जाऊन अभिनंदन करणे, whatsapp status लावणे, याची चढाओढ लागलेली दिसून येत आहे.
परंतू खरच याची गरज आहे का ? हा विचार युवकांनी करण्याची गरज आहे. निवडणुकीत उपयोगी पडेल या साठी हा सर्व अट्टाहास असून खरच काळजी असेल तर
वाढदिवस साजरा करण्यासाठी चढाओढ न करता
युवकांचे हाताला काम द्या, नोकरी साठी प्रयत्न करा, त्याला व्यवसायासाठी मार्गदर्शन करा त्याचे आयुष्य मार्गी लागेल
परंतू असा विचार
ना युवक करतात ना पुढारी
एखदा वाढदिवस साजरा केला की हा आपला असा समज असून युवकांच्या मूळ प्रश्नाला बगल दिली जात आहे
त्यामूळे युवकांनी सावध व्ह्यवे अशी चर्चा सुरु आहे.