*जे 40 वर्षात झाले नाही ते एका वर्षात केले-पक्षनेते भगवान जगताप*: *वॉर्डाचा विकास तसा गावचा विकास हाच आमचा आत्मविश्वास*

 *जे 40 वर्षात झाले नाही ते एका वर्षात केले-पक्षनेते भगवान जगताप*: *वॉर्डाचा विकास तसा गावचा विकास हाच आमचा आत्मविश्वास*

: *करकंब/  प्रतिनिधी *

:- करकंब एक गाव ऐतिहासिक सांस्कृतिक धार्मिक आणि विशेषता राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचे गाव म्हणून सोलापूर जिल्ह्यात सुपरिचित आहे. या करकंब गावातील वार्ड क्रमांक 4 हा करकंब ग्रामपंचायत च्या स्थापनेपासून ते आज तागायत पर्यंत सत्तेचा महत्वाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. याच वार्ड क्रमांक चार मधून करकंब ग्रामपंचायतची सत्तेची चावी कोणाच्या हातात द्यायची ही या वार्डातील सुजाण आणि सुज्ञान नागरिकांना चांगलेच ठाऊक असल्याने गेल्या अनेक वर्षापासून सत्तेचा केंद्रबिंदू असलेल्या वार्ड क्रमांक 4 हा नेहमीच मूलभूत सुविधा पासून वंचित राहिलेला होता . अशातच नुकत्याच गत वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत याच वार्ड क्रमांक चार मधून पुन्हा एकदा सत्तेची चावी दिल्याने चाळीस वर्षात या चार नंबर कडे दुर्लक्ष झाले... ते आता एका वर्षात या चार नंबर वॉर्डातून प्राध्यापक सतीश देशमुख यांच्या सौभाग्यवती कल्पनाताई सतीश देशमुख या निवडून आल्यापासून या चार नंबर वार्डा चे रूप पालटलेअसून या वार्डात स्वतः प्राध्यापक सतीश देशमुख यांनी लक्ष घालून प्रत्येक गोष्टीत पाठपुरावा करून सिमेंट काँक्रिटचे रस्ते, लोकांच्या समस्या अडीअडचणी, प्रत्येक लोकांच्या कार्यात प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष सहभाग वेळोवेळी लोकांच्या मदतीला धावून जाणे, यामुळे चाळीस वर्षात विरोधकांना जे जमले नाही ते एका वर्षात करून दाखविले .असल्याचे मत या वार्ड क्रमांक चार मधील माजी ग्रामपंचायत सदस्य व पक्षनेते भगवान जगताप यांनी व्यक्त केले.*
: *करकंब या वार्ड नंबर चार मधील लोकांनी विश्वासाच्या बळावर सत्तेची चावी हाती दिल्यानंतर या चार नंबर वार्डातील विकासाबरोबरच गावातील सर्वच वार्ड व वाड्या-वस्त्या वरील आणि गावचा विकास आज आमचा आत्मविश्वास राहील असे ठामपणे मत व्यक्त पक्षनेते भगवान जगताप यांनी व्यक्त केले. लोकांच्या विश्वासावर व आमच्या आत्मविश्वासाच्या बळावर यापुढेही लोकांची सेवा म्हणून काम करण्याची भूमिका लोकांनी दिलेली संधीचे सोने करणार असून यामुळे विरोधकांचे सध्या धाबे दणाणले असल्याने सध्या गावात विरोधक आहेत की नाही हा एक संशोधनाचा विषय असल्याची चर्चाही गावात सुरू असल्याची चर्चा असून विरोधकांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याने जमिनीवर न बसता प्रत्यक्षात जमिनीवर उतरून लोकांच्या समस्यांची अडीअडचणी ची त्यांच्या मूलभूत गरजांची त्यांना समजून घेण्याची भाषा आत्मविश्वासाने सर्वसामान्यांच्या लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचण्याची गरज असल्याची यावेळी भावना पक्षनेते भगवान जगताप यांनी व्यक्त केली.*