*खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची करकंब पाझर तलावास भेट.* : *शिव मल्हार न्यूज इफेक्ट* * करकंब नगरीत खासदार निंबाळकर यांचे उत्साहाने स्वागत* *पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी निश्चित पणाने पाठपुरावा करणार* *करकंब च्या पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी कालव्यासाठी लवकरच मीटिंग आयोजित करणार*
करकंब /प्रतिनिधी
करकंब येथील ब्रिटिशकालीन 45 एकर असलेला गाव पाजर तलाव गेल्या अनेक वर्षापासून कोरडा असल्याने या तलावात सीना माढा यातून जोड कालवा काढून पूर्व भागातील दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्या बरोबरच या तलावात पाणी सोडण्याबाबत चे प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब आंबुरे यांनी माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना वेळोवेळी चर्चा करून दिल्ली येथे जाऊन याबाबत माहिती सांगितली होती. या सर्व बाबींची पाहणी करण्यासाठी स्वतः खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी आज करकंब येथील ब्रिटिशकालीन तलावास भेट दिली.
सुरुवातीस खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे करकंब येथील शंकर नगर चौकात आले असता त्यांचे प्रणव परिचारक युवा मंचचे अध्यक्ष प्रीतम नकाते, रमेश खारे सर, अरुण बनकर त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्साहाने स्वागत केले. यावेळी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे करकंब शहराध्यक्ष महेंद्र लोंढे यांनी अपंग निधी बाबत व दिव्यांग सायकली बाबत लेखी निवेदन दिले.त्यानंतर एसटी स्टँड येथे भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस लक्ष्मण वंजारी यांनी स्वागत केले. यावेळी शहराध्यक्ष रोहिदास चौगुले मोहन शिंगटे व भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना करकंब ला जोडणाऱ्या रस्त्याबाबत व पालखी मार्गाच्या बाबत निवेदन दिले. तसेच करकंब येथील वडार भवन चे काम अद्याप निधीअभावी अपूर्ण असून यासाठी येथील वडार समाज बांधवाच्या वतीने पत्रकार मनोज पवार संजय धोत्रे सुनील मोहिते व इतर समाज बांधवांना निधीबाबत मागणीचे निवेदन दिले. त्यानंतर आतार चौक येथेही अल्पसंख्याक भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सलीम बागवान यांच्या हस्ते ही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुस्तफा बागवान भाजपाचे कार्यकर्ते बहुसंख्य मुस्लीम समाज उपस्थित होते. थोरली वेस येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा सत्कार व स्वागत औदुंबर कुंभार नितीन गुळमे व संदीप अभंगराव यांनी केला. प्रथमच करकंब करानी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे हलग्या च्या निनादात व उत्साहाने स्वागत केल्याने खासदार रणजीत सिंह हि यावेळी भारावून गेले. यावेळी त्यांनी बोलताना या तलावाच्या माध्यमातून या तलावाची निश्चितपणे केंद्राच्या माध्यमातून दुरुस्ती करून तसेच सीना माढा योजनेअंतर्गत जोड कालवा साठी लवकरच मीटिंग बोलावून याबाबत प्रयत्न करुन राज्य शासनाची एनओसी आल्यास केंद्राकडून मी स्वतः त्याचा पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी सांगितले.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बरोबर भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब आंबुरे, लतीफ तांबोळी फलटण, रयत क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नंदकुमार व्यवहारे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख, माजी सरपंच मारुती अण्णा देशमुख, विरोधी पक्षनेते राहुल पूरवत माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव पांडुरंग व्यवहारे विकास शहा संतोष धोत्रे बापू शिंदे पांडुरंग नगरकर नागनाथ गायकवाड मुस्तफा बागवान, दिलीप व्यवहारे सुरेश शिंदेसंदीप शिंदे परमेश्वर शिंदे विजय मामा माळी बापू धांडे सोमनाथ मांजरे रामेश्वर खाडे आदीसह भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते ,विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व इतर पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ शेतकरी महिला भगिनी या वेळी उपस्थित होते.