*ना.नितीन गडकरी सोमवारी पंढरीत* *पालखी महामार्गाचे भूमिपूजन करणार*

*ना.नितीन गडकरी सोमवारी पंढरीत*  *पालखी महामार्गाचे भूमिपूजन करणार*

पंढरपूर  (प्रतिनिधी)

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी हे सोमवारी पंढरीत येत आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज तसेच श्री संत तुकाराम महाराज, या दोन्ही पालखी मार्गाचे ते उद्घाटन करणार आहेत. याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती आ. प्रशांत परिचारक यांच्याकडून देण्यात आली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी हे शुक्रवारी पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. पंढरपूर मध्ये ते संतांच्या पालखी मार्गांचे भूमिपूजन करणार आहेत. याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित नागरिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा संवाद साधणार आहेत. ना. नितीन गडकरी हे दुपारी १२ वाजता पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत. यानंतर ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेणार आहेत. यानंतर पंढरपूर शहरातील पंतनगरमध्ये सोलापूर आणि परिसरातील भाजप नेत्यांच्या भेटी-गाठी चा कार्यक्रम, पंतनगर मध्येच आटोपून घेणार आहेत. यानंतर दुपारी ठीक २ वाजता ते पंढरपूर शहरातील रेल्वे मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य अशा मंचावर उपस्थित राहणार आहेत.

 यावेळी त्यांच्या शुभहस्ते, श्री संत ज्ञानेश्वर महाराज (पंढरपूर ते आळंदी) तसेच श्री संत तुकाराम महाराज (पंढरपूर ते देहू) या दोन्ही महामार्गांच्या कामाचे भूमिपूजन करणार आहेत. पंढरपूर ते देहू आणि पंढरपूर ते आळंदी या दोन्ही रोडचे काम काही महिन्यांपूर्वीच सुरू करण्यात आले आहे. परंतु या कामाचे भूमिपूजन कोरोना काळामुळे राहून गेले होते. यामुळेच हा भूमिपूजनाचा कार्यक्रम ना. नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम संपन्न होताच, भारताचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा उपस्थित जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासह, शेजारच्या इतर जिल्ह्यांतून अनेक आमदार, खासदार, तसेच भाजपाचे पदाधिकारी आदी नेतेगण उपस्थित राहणार असल्याची माहिती, विधान परिषद सदस्य आ प्रशांत परिचारक, तसेच विधानसभा सदस्य समाधान अवताडे यांच्याकडून देण्यात आली आहे.

चौकट

पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन संवाद साधणार  .....

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंढरीत ना. नितीन गडकरींच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमातील, उपस्थितांना ऑनलाईन संबोधित करणार आहेत. याबाबतची सर्व ती व्यवस्था येथील रेल्वे मैदानावरील भव्य अशा स्टेजवर करण्यात आली आहे. ना. गडकरी यांच्या पंढरपूर दौऱ्यामुळे पंढरपूर शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

चौकट
या मान्यवरांची उपस्थिती


खा. जय सिद्धेश्वर स्वामी , खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी खा. सुभाष देशमुख, आ. विजयसिंह देशमुख, आ. प्रशांत परिचारक, आ. समाधान आवताडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचेसह, जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील भाजपाचे आमदार, खासदार आणि पदाधिकारी, या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती, आ. प्रशांत परिचारक यांच्याकडून देण्यात आली आहे.