*करकब पोलिसांचे गावातील विविध भागातून परेड*!
करकंब /प्रतिनिधी
येणारा गणेशोत्सव काळ तसेच कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढू नये यासाठी नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन काटेकोरपणे करणे अत्यंत आवश्यक असल्याने यासाठी करकम पोलीस ठाणे अंतर्गत करकंब शहरातून पोलिसांचा परेड काढण्यात आला.
पोलीस परेड मध्ये करकंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारु, पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे यांच्यासह करकंब पोलीस ठाण्यातील सर्व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. हा पोलिसांचा परेड पोलीस स्टेशन पासून एसटी स्टँड ते आतार चौक ते थोरली वेस्, ते टिळक चौक धाकटी वेस, शुक्रवार पेठ सोमवार पेठ भागातून काढण्यात आला.
यावेळी नागरिकांनी कोरणा च्या पार्श्वभूमीवर मास्कचा वापर करावा, लसीकरण करून घ्यावे, शासनाच्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन सपोनि निलेश तारु व व पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे यांनी केले.