*मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन* . .*शिवतीर्थ मुंबई येथे राज ठाकरे यांनी शाबासकी देत केले प्रकाशन* *निवड होऊन दोन वर्षेत केले पक्षवाढीसाठी मोठे कार्य*

*मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन* .  .*शिवतीर्थ मुंबई येथे राज ठाकरे यांनी शाबासकी देत केले प्रकाशन*  *निवड होऊन दोन वर्षेत केले पक्षवाढीसाठी मोठे कार्य*

पंढरपूर/प्रतिनीधी 

. मनसेच्या नेतेपदी पंढरपूर येथील धडाडीचे नेतृत्व दिलीपबापू धोत्रे यांची निवड होऊन अवघे दोन वर्ष झाली आहेत. या कालावधीत धोत्रे यांनी केवळ पक्ष वाढीसाठी मोठ योगदान दिले आहे. या दोन वर्षांमध्ये केलेल्या कार्याच्या अहवालाचे प्रकाशन मुंबई येथे शिवतीर्थ निवासस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष  राज साहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी धोत्रे यांच्या कार्याबद्दल स्वतः राज ठाकरे यांनी पाठीवर शाबासकीची थाप मारली असल्याने अजूनही काम करण्याची धोत्रे यांना ऊर्जा मिळाली आहे.

यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर ,मनसे नेतेअमितजी ठाकरे, मनसे नेते आमदार राजू दादा पाटील,मनसे नेते नितीन सरदेसाई, मनसे नेते अविनाश अभ्यंकर ,मनसे नेते शिरीष सावंत, मनसे नेते संजय चित्रे, मनसे नेते अभिजीत पानसे, मनसे नेते संदीप देशपांडे, मनसे नेते अविनाश जाधव, प्रदेश सरचिटणीस संतोष भाऊ नागरगोजे, रस्ते स्थापना चे अध्यक्ष योगेश परुळेकर, प्रदेश सरचिटणीस किशोर भाऊ शिंदे, प्रदेश सरचिटणीस वसंत तात्या मोरे, प्रदेश सरचिटणीस बाळा शेडगे, प्रदेश सरचिटणीस रणजीत शिरोळे इत्यादी उपस्थित होते.