*सिंहगड मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील रूपाली चौधरीची ३ नामांकित कंपनीत निवड*
पंढरपुर: /प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेली पापरी (ता. मोहोळ) येथील कुमारी रूपाली रामचंद्र चौधरी हिने ३ नामांकित कंपनीत मुलाखती दिल्या होत्या. या तीन ही कंपनीत रूपाली रामचंद्र चौधरी हिची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.
देशातील व परदेशातील नामांकित कंपन्यांना आवश्यक असलेले परफेक्ट इंजिनिअर हे पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये घडविले जातात. कंपनीला आवश्यक असलेले ज्ञान, गुण यांचा समन्वय साधून महाविद्यालय विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पद्धतीने शिक्षण व प्लेसमेंट ची तयारी करून घेते. यामुळेच पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील विद्यार्थी मुलाखती देण्यासाठी सक्षम होऊन यशस्वी होत आहेत.
चालू शैक्षणिक वर्षांत मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असतानाच कुमारी रूपाली रामचंद्र चौधरी हिची पायबाय थ्री कौन्सिलिंग सर्विसेस प्रा. लिमिटेड (वार्षिक पॅकेज येथील ३.८८ लाख रूपये, नीलसाॅप्ट (वार्षिक पॅकेज ३.५० लाख रूपये) आणि क्युस्पायडर कंपनीत प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.
तिच्या या निवडीबद्दल महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. सोमनाथ कोळी, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. अतुल कुलकर्णी आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.