*तृतीय पंथीयाना तहसील कार्यालयाच्या वतीने रेशन कार्डचे वाटप* *अन्नसुरक्षा योजनेसह संजय गांधी योजनेत केला समावेश*

*तृतीय पंथीयाना तहसील कार्यालयाच्या वतीने रेशन कार्डचे वाटप*  *अन्नसुरक्षा योजनेसह संजय गांधी योजनेत केला समावेश*

पंढरपूर/प्रातीनिधी

महसूल सप्ताहचे औचित्य साधून पंढरपूर तहसील कार्यालयाच्या वतीने तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्या हस्ते येथील तृतीय पंथीयांना रेशन कार्डचे वाटप करण्यात आले. 
 हा कार्यक्रम गुरुवारी येथील तहसील कार्यालयाच्या पाठीमागील रायगड भवन येथे पार पडला. यावेळी उपस्थित तृतीय पंथीयांस आधारकार्ड दुरुस्ती, करून देण्यात आली. शासनाकडून देण्यात येत असलेल्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये नावे समाविष्ट करण्यात आली.यामुळे दरमहा दीड हजार रूपये मानधन मिळणार आहे.
    या वाटप करण्यात आलेल्या रेशन कार्ड धारकांना अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात आले असून दरमहा धान्य मिळणार आहे. या रेशन कार्डवराती दवाखान्यात पाच लाख रूपये पर्यंत मोफत उपचार घेण्याचा लाभ मिळणार आहे. तसेच ज्यांचे नाव मतदार यादीत नाही अशा लोकांचे मतदार यादीत नाव घेण्यासाठी फॉर्म भरून घेण्यात आले.यावेळी जवळपास ५०तृतीयपंथीय उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे वेळी पुरवठा अधिकारी सदानंद नाईक, पुरवठा निरीक्षण अधिकारी शीतल कान्हेरी, निवडणूक नायब तहसीलदार वैभव बुचके, पंढरपूर चे मंडल अधिकारी विजयकुमार शिवशरण, तलाठी राजेंद्र वाघमारे, सहाय्यक तलाठी अनिता जाधव यांचेसह पंढरपूर तालुक्यातील सर्व तलाठी , मंडल अधिकारी आणि तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.