*करकंब नगरपंचायती साठी मनसे भाजप शिवसेना व विविध संघटना करणार जनांदोलन*
करकंब /प्रतिनिधी
- करकंब नगरपंचायती साठी सन 2018साली ग्रामसभेमध्ये युवा क्रांतीच्या माध्यमातून भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण वंजारी यांच्या नावाने ग्रामसभेच्या मंजुरीने करकम नगरपंचायत यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता सण 2018साली नगरविकास खात्याकडून याबाबत अहवालाची सविस्तर मागणी करण्यात आली होती सन 2020 मध्ये त्रुटींची पूर्तता करण्यासंबंधीचे पत्र ग्रामपंचायत गट विकास अधिकारी पंचायत समिती पंढरपूर यांना दिले होते त्यानंतर सन 2021 मध्ये ही त्रुटी संबंधित पुन्हा पत्र नगरविकास खात्याकडून देण्यात आले होते परंतु तत्कालीन निष्क्रिय नेतेमंडळींच्या उदासीनतेमुळे त्रुटींची पूर्तता करू न शकल्यामुळे अद्याप पर्यंत करकम च्या नगरपंचायती साठी चा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे धूळखात पडून आहे.
परंतु अजूनही वेळ गेलेली नाही आता तरी करकंबच्या सत्ताधाऱ्यांनी त्रुटींची पूर्तता करून आदरणीय संजय मामा शिंदे आमदार बबनदादा शिंदे यांचा माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याशी असलेल्या घनिष्ठ संबंधाचा करकंब नगरपंचायत होण्यासाठी यांच्या माध्यमातून प्रयत्न केल्यास करकम नगरपंचायत होण्यास अजिबात विलंब लागणार नाही तर करकंब नगरपंचायत होण्याचा मार्ग सुकर होईल ग्रामपंचायतीचे नगरपंचायत रूपांतर झाल्यानंतर नगर विकास मंत्रालयाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल त्यामुळे गावचा विकास झपाट्याने होण्यास मदत होईल.
अन्यथा करकंब नगरपंचायत होण्यासाठी मनसे भाजपा शिवसेना व विविध संघटना ग्रामस्थ विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते गावातील कार्यशील युवक वर्ग सामाजिक कार्यकर्ते महिला भगिनी विरोधक या सर्वांना बरोबर घेऊन अकलूज नातेपुते येथील यशस्वी आंदोलनाच्या धरतीवर जन आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
चौकट - गावच्या सर्वांगीण विकासासाठी सत्ताधाऱ्यांनी ज्या काही बाबींच्या त्रुटी आहेत त्या पूर्ण करून लवकरात लवकर संबंधित कार्यालयाकडे कागदपत्रांची पुर्तता करावी अन्यथा मनसे भाजपा शिवसेना व सर्व गावातील सामाजिक संघटना व विरोधक यांना एकत्रित घेऊन आंदोलन करण्यात येईल.
लक्ष्मण वंजारी
भाजपा युवा मोर्चा ता.अध्यक्ष.