*नूतन संचालक मंडळात प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांचाही समावेश* *सहकार शिरोमणीच्या मोठ्या खांदेपालट मधूनही निष्ठावंत म्हणून लागली आहे वर्णी*
पंढरपूर/प्रतिनीधी
पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी सह साखर कारखाना निवडणुकीत सत्ताधारी काळे गटाकडून मोठी खांदेपालट करण्यात आली होती. यामधून अनेक विद्यमान संचालक यांना डच्चू देण्यात आला होता. परंतु यामध्ये अतिशय निष्ठावंत समजले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांना उमेदवारीची संधी देण्यात आली होती. त्यामुळे काळे गटाला या चुरशीच्या निवडणुकीत मोठा फायदा झाला आहे.
नागेश फाटे यांना गादेगाव ऊस उत्पादक गटातून उमेदवारी देण्यात आली होती. फाटे यांचा या भागासह सर्व तालुक्यातून सलोख्याचे संबंध होते. गादेगाव आणि भागातून प्रचारासाठी फिरत असताना, वैयक्तिक सभासद यांची मने वळविण्यासाठी काळे गटाला मोठा फायदा झाला आहे.
स्व. वसंतदादा काळे यांच्यापासूनच या नागेशदादा फाटे यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली होती. काळे घरांण्यावरील आपली निष्ठा कायम अबाधित ठेवली होती. यामुळेच त्याचे नाव आजही निष्ठावंत शिलेदार यांच्या मुख्य नेत्यामध्ये घेतले जात आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत काळे यांनी कारखान्याच्या अडचणी साठी भाजप मध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी नागेशदादा फाटे यांच्याकडे सोलापूर जिल्हा काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष पद होते. तरीही त्या एवढ्या मोठ्या पदाचा राजीनामा देऊन आपल्या नेत्या प्रती असणारी निष्ठा अवघ्या सोलापूर जिल्ह्याने पहिली होती. काळे यांच्या गटासाठी कोणतीही भूमिका घेण्याची वेळ येईल त्यावेळी चार पावले मागे पुढे सरकत हा आपला गट मजबूत रहावा यासाठी फाटे यांचे मोठ योगदान असते यामुळे त्यांना मुख्य नेत्यांमध्ये स्थान देण्यात येत असते.
नागेशदादा फाटे यांना या भागातून इतर उमेदवार यांच्या पेक्षा जास्त मतदान मिळाले आहे. यामुळे विरोधक यांनीही वैयक्तिक फाटे यांना पसंदी दिली असल्याचे दिसून आले आहे.