*रोटरीचे काम करणे ही एक प्रकारची 'पुण्याई':- विष्णू मोंढे* *करकंबच्या आरोग्य शिबिरात १२० जणांची तपासणी.
करकंब /प्रतिनिधी :
- रोटरी क्लब नेहमीच स्वखर्चातून समाजपयोगी कामे करीत असतो त्यामुळे हा एक 'पुण्याई'चाच मार्ग असल्याचे मत पी.डी.जी. रोटरीयन विष्णू मोंढे यांनी व्यक्त केले. यावेळी रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर दीपक चोथे, करकंब रोटरीचे अध्यक्ष रो. रघुनाथ जी. जाधव, संस्थापक अध्यक्ष रो. डॉ. प्रशांतकुमार मोरे, सचिव डॉ. अक्षय मोरे, नोबल हाॅस्पिटलचे डायरेक्टर डॉ. सिद्धराम राऊत, डॉ. अग्रवाल,मोडनिंब रोटरीचे अध्यक्ष औदुंबर पाटील, माजी अध्यक्ष डॉ. प्रशांत कोल्हे, सांगोला रोटरीचे अध्यक्ष प्रा. सदाशिव पाटील, डॉ. मच्छिंद्र सोलनकर, संपादक मोहन मस्के, करकंब रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. सौ. मृदुला तळेकर, धनंजय इदाते, डॉ. विनोद शिंगटे, सुनिल दुधाणे, रोटरीयन छाया मोरे, सुनीता देशपांडे, डॉ. सरस्वती मोरे, वरुण पुरवत, लक्ष्मण जाधव इत्यादी उपस्थित होते.
करकंब रोटरीचे अध्यक्ष रो.रघुनाथजी जाधव यांनी सांगितले की, करकंब रोटरीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविले आहेत. नोबेल हाॅस्पिटलच्या टीमचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. काही मोठे आजार असणा-यांचा इलाज कमी खर्चात करण्यासाठी प्रयत्न करु.
असिस्टंट गव्हर्नर दीपक चोथे म्हणाले,' मरणानंतर बरोबर काहीच नेता येत नाही. परंतू तुम्ही केलेले 'पुण्य'च बरोबर येऊ शकते. ते आपण करीत असल्याचे दिसून येत आहे.
डॉ. राऊत यांनी ही कार्याचे कौतुक करुन रुग्णांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
*१२० रुग्णांची तपासणी*
रोटरी क्लब ऑफ करकंब आयोजित रोटरी महाआरोग्य शिबिरात एकूण १२० लोकांची तपासणी करण्यात आली. यात सर्व लोकांचे हिमोग्लोबिन, रक्तगट, रक्तातील साखर, रक्तचाप (प्लस ), ऑक्सिजन लेवल, वजन, उंची, BMI (body mass index) मोफत तपासण्यात आले त्यापैकी ८ जणांना रक्तक्षय (aneamia), ५ जणांना मधुमेह, ५ जणांना रक्तदाब असल्याचे निदर्शनास आले. त्यावर मोफत चिकित्सा करण्यात आली.
एकूण १२० रुग्णापैकी ५५ पुरुष आणि ६५ स्त्रीरुग्ण होते त्यापैकी ७५ अस्थीरोग रुग्णाची, १६ त्वचारोग रुग्णांची मोफत तपासणी व चिकित्सा करण्यात आली, ६५ महिला रुग्णांची डॉ. गिरीजा पाटील ब्रेस्ट कॅन्सर तज्ञ व डॉ. अनुराधा माने स्त्रीरोग तज्ञ यांच्या कडून तपासणी करण्यात आली त्यात ११ महिलांना स्तनाचा कॅन्सर असल्याचे लक्षात आली त्याची योग्य ट्रीटमेंट नोबल हॉस्पिटल येथे करण्यात येईल.
या शिबिरासाठी सर्व रोटरीयन तसेच डॉ. गिरीजा पाटील, डॉ. सिद्धार्थ भंडारी, डॉ. अनुराधा, डॉ. काजल पाटील, डॉ. तृप्ती बोराडे, विश्वजीत मोरे, लॅब असिस्टंट विश्वास अनवते, संतोष अनवते, औदुंबर परदेशी, सानिका चव्हाण, याकुब मुजावर इत्यादिंचे सहकार्य लाभले. कार्यक्रमानंतर सर्वांनी हाॅटेल महावीर येथे करकंबच्या 'बाजारी आमटीचा' स्वाद घेतला.