पंढरीत मुस्लिम समाजाला केले रमजान इद साठी साहित्य वाटप
पंढरपूर : प्रतिनिधी
पंढरपूर येथील मुस्लिम समाजातील लोकाना रमजान ईद सण साजरा करण्यासाठी येथील भिमशक्तीसांस्कृतिकशैक्षणिककलाव क्रिडा मंडळाच्या व उमेश सर्वगोड मित्र परिवार यांच्या वतीने संतपेठ महापुर चाळ व बडवेचर झोपडपट्टी या भागात येथील सर्व मुस्लीम बांधवाना शिक्रुमा चे साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थितीत मा.संतोष सर्वगोड, मा.निलेश जाधव ,सुधीर ( लखन ) सर्वगोड, प्रशांत सर्वगोड, सुमित माने, नवनाथ गायकवाड, आदित्य गावकरे, अभिषेक फडतरे, आदित्य माने, कालिदास तुपसुंदर, व सर्व प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.