*करकंब येथे श्रीराम प्रतिष्ठान यांचे वतीने संगीतरजनीचे आयोजन.* *ख्यातनाम मराठी इंडियन आयडॉल उपविजेता जगदीश चव्हाण आणि भक्ती साळुंखे*
करकंब/ प्रतिनिधी
:- येथील श्रीराम प्रतिष्ठान , करकंब यांचे वतीने प्रतिवर्षाप्रमाणे श्रीराम नवमी निमित्ताने रविवार दिनांक २६ मार्च रात्री ८:००वा.शाकंबरी गार्डन सोमवार पेठ येथे आयोजित करण्यात आली असून या संगीतरजनीमध्ये मराठी सोनी इंडियन आयडॉल उपविजेता जगदीश चव्हाण आणि भक्ती साळुंखे यांच्या अभंग हिंदी मराठी चित्रपट गीतांचा बहारदार नजराणा मुंबई येथील वाद्यवृंदांच्या समवेत आयोजित करण्यात आला असून सर्व करकंबकर व पंचक्रोशितील कला रसिक श्रोत्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक मिलिंद उकरंडे अध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे सचिव विजय भागवत यांनी केले आहे,गेल्या १२वर्षांच्या काळात अनेक समाजपयोगी, आध्यात्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात आले असून त्यामध्ये श्रीराम मंदिर सोमवार पेठ मंदिराचा जिर्णोद्धार,तेरा तासात तेरा कोटी रामनाम जप, दुष्काळात पाणी आणि गुरांना चारा वाटप,वारकऱ्यांना चहा वाटप,भागवत कथा,राम कथा,योग शिबिराचे रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते,तसेच गेल्या ९वर्षापासून महाराष्ट्रातील नामवंत ख्यातनाम गायक गायकांचा संगीत महोत्सव प्रत्येक वर्षी साजरा करत असताना चालू १०व्या वर्षी अभंग, मराठी हिंदी चित्रपट गीतांची मेजवानी करकंबकरांना ऐकायला मिळणार असून सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम प्रतिष्ठान करकंब चे सर्व सदस्य अधिक परिश्रम घेत आहेत.