*एस.पी.स्कूलमध्ये फ्रुट डे उत्साहामध्ये संपन्न*

*एस.पी.स्कूलमध्ये फ्रुट डे उत्साहामध्ये संपन्न*

 

करकंब /प्रतिनिधी 
 ग्रामीण भागामध्ये गुणवत्तेसाठी नावाजलेल्या व उपक्रमशील अशा एस. पी. स्कूल व ज्युनिअर कॉलेज, नांदोरे या प्रशालेमध्ये मध्ये कृतीयुक्त शिक्षणाला जास्त भर दिला जातो यानुसार स्कूलमध्ये नवनवीन उपक्रम राबवले जातात.आज प्रि प्रायमरी विभाग प्रमुख श्री.ढावरे सर यांच्या संकल्पनेतून प्रशालेमध्ये फ्रुट डे साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतःहून वेगवेगळ्या फळांच्या प्रतिकृती तयार केल्या होत्या तसेच सर्व प्रकारची फळे प्रत्यक्षामध्ये मुलांना दाखवण्यात आली. तसेच प्रत्येक फळांमधून आपल्या शरिरासाठी आवश्यक मिळणारे घटक ,त्याचे जीवनातील महत्त्व इ. विषयी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
 हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी  उलभगत मॅडम ,पवार मॅडम, माने मॅडम, देशमुख मॅडम, वाघ मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले.
 या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष वलगे, खजिनदार विक्रम भिंगारे, सचिव अश्वराज वाघ, प्रकल्प संचालिका वासंती वलगे मॅडम, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण मॅडम यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. कृतीतून शिक्षण दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होते. या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे पालकांकडून कौतुक होत आहे.