*नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना लाखो रुपयांचा गंडा.....!* *करकंब येथील तोतया विरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.*
करकंब/ प्रतिनिधी
:-बीड, नाशिक, पुणे, नांदेड, धाराशिव आदी विविध ठिकाणी सुशिक्षित बेकार मुलांना महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मध्ये नोकरी लावतो असे सांगून अनेक सुशिक्षित तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या करकंब येथील अनिल गिरीधर केंदळे याचे विरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ४०६,४२०अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल गिरीधर केंदळे. राहणार - करकंब ता. पंढरपूर हे मी महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मध्ये नोकरी लावतो. कोणी आपले सुशिक्षित तरुण असतील तर मला माझे मोबाईल नंबर वरती संपर्क करून जे सुशिक्षित तरुण पोलीस व आर्मी भरतीसाठी आहेत. त्यांना नोकरी लावतो .असे सांगून अनेक सुशिक्षित तरुणांची विश्वासाने फसवणूक केली असल्याची तक्रार अनिल विश्वनाथ पाटील राहणार- दिंडोरी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. या सुशिक्षित तरुणांच्या फसवणुकीमुळे विदर्भ, मराठवाडा सह पश्चिम महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहीती अशी की, अमोल विश्वनाथ पाटील रा. दिंडेगाव ता. तुळजापुर जि.धाराशिव मी मागील चार वर्षापासून भारतीय सैन्य दलात शिपाई या पदावरती नोकरीस आहे. माझा मित्र सुर्यकांत रोटे रा. हुन्नूर ता. अक्कलकोट ओळख झाली होती .तेव्हापासून आम्ही दोघे एकमेकांचे संपर्कात होतो. जुन - 2022 मध्ये सूर्यकांत रोटे याचा त्यांचे मो.नं. 7057874380 वरुन माझे मो.क्र. 7620616610 वर फोन आला की, माझे ओळखीचा अनिल गिरीधर केदळे रा. करकंब ता. पंढरपुर जि. सोलापुर हे असुन ते सुशिक्षीत बेकार मुलांना (MSF) महाराष्ट्र सिक्युरटी फोर्स मध्ये नौकरीस लावतात, तुझे ओळखीचे कोणी मुले असतील तर त्यांच्याशी संपर्क कर असे म्हणुन त्यांनी अनिल केदळे यांचेशी संपर्क करण्यासाठी त्यांचे मो.नं. 9094171755 हा नंबर मला दिला .त्यावरुन मी अनिल केदळे यांच्याशी वरील मो. क्र. वर संपर्क साधला असता त्यांनी मला सांगितले की, मी (MSF) महाराष्ट्र सिक्युरटी फोर्स मध्ये नौकरी लावतो. आपले कोणी सुशिक्षीत तरुण असतील तर मला नाव, पत्ता व प्रत्येकी 20000/- रुपये माझा मो.नं.9094175555, 9921782355, 9922382988, 7820856172, यावर फोन पे गुगल पे, पेटीएम, अकाउंट ट्रान्सपर द्वारे पाठव .असे म्हणाल्याने मी दिनांक 07/08/2022 ते 14/10/2022 पर्यंत अर्जीत रजेवर ड्युटीवरुन गावी आलो होतो. त्यादरम्यान मी माझे संपर्कात असलेले सुशिक्षीत तरुण जे पोलीस, अर्मीमध्ये भरतीसाठी तयारी करीत होते .व माझे तसेच सूर्यकांत रोटे यांचे संपर्कात होते .त्यांना फोन करून माहीती दिली असता ते पण महाराष्ट्र सेक्युरेटी फोर्स मध्ये नौकरी करण्यास तयार झाले. त्यांना प्रत्येकी 20000/- रुपये लागतील असे सांगितले. असता त्यांनी त्यास होकार देवुन माझे बँकखाते अॅक्सीस बँक शाखा- तुळजापुर खाते क्र. 918010098429131, व आयसीआयसीआय बँक शाखा- तुळजापुर खाते क्र. 203301504189 स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा -अणदुर खाते क्र. 35293335679 यावरुन मी अनिल केदंळे यांना फोन पे गुगल पे, पेटीएम अकाउन्ट ट्रान्सपर द्वारें त्यांचे मो.नं.9094175555, 9921782355, 9922382988, 7820856172, बँक ऑफ महाराष्ट्रच्या खातेवर माझा भाऊ मित्र यांच्या खातेवरून मी 8,00000 रुपये रक्कम पाठविले आहेत. तसेच माझा मित्र सुर्यकांत रोटे यांनी त्यांचे फोन पे गुगल पे, पेटीएम अकाउंट ट्रान्सपर द्वारे त्यांचे मो.नं. 9094175555,9921782355, 9922382988.7820856172, बँक ऑफ महाराष्ट्रच्या खातेवर 1,55000 रुपये तसेच मी व रोटे यांनी अॅक्सीस बँक शाखा तुळजापुर येथे प्रत्यक्ष भेटले. नंतर दिनांक 10/02/22 रोजी रोख 300000/- रुपये दिले आहेत. तसेच मी व माझा मित्र सूर्यकांत रोटे यांनी आमचे ओळखीचे पन्नास (50) सुशिक्षित तरूणांना महाराष्ट्र सेक्युरेटी फोर्स मध्ये नौकरी लावण्यासाठी व इतर खर्चासाठी एकुण 12,55000/- रुपये दिनांक-1/08/2022 ते 10/11/2022 च्या दरम्यान पाठविले आहेत.
अनिल केदंळे आमच्या ओळखीचे पन्नास सुशिक्षीत तरुनाला बोलावुन त्यापैकी 1) ऋषीकेश गवळी. रा. नवगण राजुरी ता. बिड 2) वैभव बाळासाहेब पाढरे .रा. चिखली ता. इंदापुर जि.पुणे यांना व इतर 32 असे एकुण 34 तरुणाना सप्तश्रृंगी गड वनी जि. नाशीक येथे पाठवले व 1) आशोक शालीकराम घुगे. रा. होळ ता. केज जि. बिड 2) संदीप राजु मैकलवार .रा तामसा ता. हादगाव जि. नांदेड व इतर 14 असे एकुण 16 सुशिक्षीत तरुणाना लोकमंगल साखर कारखाना लोहारा येथे पाठविले. त्या ठिकाणी सदर तरुणाना पाठविले असता त्यांना कोणत्याही प्रकारचा पगार दिला नाही. त्यामुळे अधिक चौकशी केली असता अनिल केदंळे यांची कोणतीही महाराष्ट्र सेक्युरेटी फोर्स या नावाची कोणतेही संस्था अगर कंपनी नसल्याचे सुशिक्षीत तरुणानी मला व सूर्यकांत रोटे यांना सांगितले
आम्ही ही बाब अनिल केदळे यांना विचारली असता, दुसरीकडे नौकरी लावतो म्हणुन सांगितले. परंतु आद्यापपावेतो त्यांनी कोठे ही नौकरी लावली नाही. म्हणुन आमची व तरुणांची विश्वासाने फसवणुक झाल्याचे लक्षात आले.
दिनांक- (01/08/2022 ते 10/11/2022 च्या दरम्याणच्या काळात माझी, माझा मित्र सुर्यकांत रोटे व आमच्या ओळखीचे पन्नास सुशिक्षित तरुण यांची महाराष्ट्र सेक्युरेटी फोर्स नौकरी लावण्याचे आमिष दाखवुन प्रत्येकी 20000 /- रुपये व इतर खर्च मिळुन अंदाजे 12.55000 /-रुपये आरोपीचे बैंक ऑफ महाराष्ट्रच्या खातेवर घेवुन विश्वासाने फसवणुक केली आहे. अशी आशयाची फिर्याद अमोल विश्वनाथ पाटील यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक -आजिनाथ काशीद, बोरे मॅडम ,यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक- व्हि.डी. चाचकर. करीत आहेत.