*एस.पी.स्कूलमध्ये महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन.*  *सौ.प्रणिता रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न* 

*एस.पी.स्कूलमध्ये महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन.*   *सौ.प्रणिता रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न* 


करकंब /प्रतिनिधी :


                 प्रत्येक महिला ही सर्व गुण संपन्न असतेच, त्यामुळेच समाजाच्या प्रत्येक घटकांमध्ये महिलांचे योगदान असल्याचे दिसून येते दिसून येते, असे प्रतिपादन  सौ.प्रणिता रणजितसिंह शिंदे यांनी केले.

           नांदोरे (ता. पंढरपूर) येथील एस. पी. पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या चित्रा वाघ, सौ. सुलभा होनराव प्रशालेच्या प्रकल्प संचालिका वासंती वलगे उपस्थित होत्या.

उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सौ. शिंदे म्हणाल्या की, 
घरातील स्वयंपाक गृहापासून ते देशाचे राष्ट्रपती पद महिला भूषवत आहात. प्राचीन काळापासून महिला या सक्षमच असल्याचे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे महिला मागे आहेत हे म्हणणे चुकीचे आहे. प्रत्येक महिलेमध्ये एक वेगळी ताकद असते फक्त आपल्या मधील या सुप्त कलागुणांची माहिती प्रत्येकीला होणे गरजेचे आहे. 
मुलांवर संस्कार करत असताना त्यांच्याशी सुसंवाद साधून त्यांच्याशी प्रत्येक बाबतीत चर्चा करणे ही आज काळाची गरज बनली आहे. त्यांच्याशी मैत्री ठेवणेही गरजेचे आहे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. 

महिला दिनाच्या निमित्ताने प्रशालेमध्ये उखाणे स्पर्धा, तळ्यात मळ्यात स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा आणि फनी गेम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये उखाणे स्पर्धेत स्वाती खळगे यांनी प्रथम, विद्या नाईकनवरे  द्वितीय तर सारिका मोहरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
तळ्यात मळ्यात स्पर्धेत मोनाली जिरेकर प्रथम, शुभांगी नाईकनवरे द्वितीय, रेश्मा केचे तृतीय तर शामल उलभगत व श्रृतिका विटेकर यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला.
 फनी गेम स्पर्धेमध्ये श्रुतिका विटेकर प्रथम, स्वाती भोसले द्वितीय व दिपाली डोके यांनी तृतीय क्रमांक पटकावला. संगीत खुर्ची स्पर्धेमध्ये मोनिका ढोबळे प्रथम, रेश्मा केचे द्वितीय, स्वरांजली मोरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

या कार्यक्रमासाठी स्वाती वाघ, निर्मला भिंगारे, स्वाती चव्हाण, पालक प्रतिनिधी विद्या गायकवाड ,भामाताई सातुरे, साखरबाई भिंगारे, सुजाता भिंगारे यांच्यासह सुमारे 270 ते 300 महिला उपस्थित होत्या. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती भोसले, रत्नमाला जानकर यांनी केले. आभार सिमा पिसे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्या पाटील ,मिना माने, अर्चना उलभगत, अभिलाषा तळेकर, तब्बसूम जमादार, रेश्मा पिसाळ, सोनाली देशमुख, तृप्ती वाघ, वैभवी चव्हाण या महिला शिक्षकांनी प्रयत्न केले.

चौकट: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून 2014 पासून गार्डी येथे कार्यरत असलेल्या डॉ. मीरा चिखले आणि भाळवणी पशुवैद्यकीय केंद्रात 2008 पासून कार्यरत  असलेल्या डॉ. स्वाती आवारे यांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.