*करकंब पोलिसांनी ग्रामीण भागातील सुपारी किलर गुन्हेगारांचे चे कंबरडे मोडले...!* *नांदोरे येथील हॉकी स्टिक ने हातपाय तोडणाऱ्या सहा आरोपींना करकंब पोलिसांनी केली अटक* *मुख्य सूत्रधार कोण....?*

*करकंब पोलिसांनी ग्रामीण भागातील सुपारी किलर गुन्हेगारांचे चे कंबरडे मोडले...!*   *नांदोरे येथील हॉकी स्टिक ने हातपाय तोडणाऱ्या सहा आरोपींना करकंब पोलिसांनी केली अटक*   *मुख्य सूत्रधार कोण....?*

*करकंब /प्रतिनिधी :-

नांदुरे ता. पंढरपूर येथील किरण राजाराम भिंगारे यांच्यावर दिनांक 23 रोजी बापूराव भिंगारे यांच्या शेताजवळच्या कॅनल वर अनोळखी इसमानी हॉकी स्टिकने किरण भिंगारे यांना हाता पायावर बेदम मारहाण करून जखमी केले होते. याची खबर स्वतः किरण भिंगारे यांनी करकंब पोलीस ठाण्यात दिली होती. दिनांक 24 रोजी 300/2022 त्याप्रमाणे भादविक 326,34,120(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.  या गुन्ह्यामध्ये हॉकी स्टिक, बेसी बॉल स्टिक चा वापर केला होता.संबंधित या अनोळखी हॉकी स्टिक ने हात पाय तोडणाऱ्या व जखमी करणाऱ्या या गुन्हेगारा विषयी प्रचंड उत्सुकता करकंब सह ग्रामीण भागात लागून राहिली होती*. 
*करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच करकंब पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष साहेब पोलीस निरीक्षक निलेश तारू पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित कुमार मोरे यांनी याबाबत या ग्रामीण भागातील सुपारी किलरचा आपल्या सहकाऱ्यासमवेत शोध घेऊन या करकंब पोलिसांनी या सुपारी किलर चे कंबरडे मोडले.* त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक अजित कुमार मोरे यांनी केलेल्या या कामगिरीमुळे ग्रामीण भागात गुन्हेगारी क्षेत्रातील गुन्हेगारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून संबंधित आरोपींना करकंब पोलिसांनी गुन्हा घडल्यापासून चारच दिवसात ताब्यात घेतले असल्याने या आरोपींना न्याय दंडाधिकारी समोर सादर केले असता वाढीव दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून या ग्रामीण भागातील गुन्हेगारी क्षेत्रातील या संशयित आरोपींचा मागचा मुख्य सूत्रधार कोण...? आता पोलिसांसमोर आवाहन निर्माण झाले  आहे. नांदोरे येथील ही घटना राजकीय वादातून झाल्याची चर्चाही होत असल्याने लवकरच या मुख्य सूत्रधाराचा करकंब पोलीस फर्दाफाश करतील.अशी आशा 
करकंबसह ग्रामीण भागातील व्यक्त केली जात असून पोलीस उप निरीक्षक अजित कुमार मोरे यांनी ग्रामीण भागात उदयास येणाऱ्या सुपारी किलरचे करकंब पोलिसांनी कंबरडे मोडल्याने करकंबसह ग्रामीण भागातून समाधान व्यक्त केले जात आहे.*