*"जागर स्वच्छता"अभियान टीम,व "करकंब गावच्या लेकीचं झाड*" *अभियान टीमच्या सदस्यांना विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेच्या वतीनं ५० टी-शर्ट चे वाटप*.

*"जागर स्वच्छता"अभियान टीम,व "करकंब गावच्या लेकीचं झाड*" *अभियान टीमच्या सदस्यांना विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेच्या वतीनं ५० टी-शर्ट चे वाटप*.

करकंब:-प्रतिनिधी 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सावाच औचित्य साधून आज करकंब येथील विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेच्या वतीने जागर स्वच्छता अभियान टीम,व करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमच्या सर्व सदस्यांना ५० टीशर्टाचे वाटप मा शाखा व्यवस्थापक कल्पेश क्षीरसागर,ॶॅड,संजय व्यवहारे ,अजीत खोटे,महेश कटले,सर्व कर्मचारी स्टाफ यांच्या उपस्थितीत करण्यात आले,गेल्या वर्षापासून करकंब येथे पर्यावरण व स्वच्छता यासाठी जागर टीम प्रत्येक रविवारी एक प्रभाग स्वच्छ करुन करकंब गाव स्वच्छ राखण्यासाठी प्रयत्न करत आहे.तसेच करकंब गावच्य लेकीचं झाड टीमच्या वतीने गेल्या वर्षापासून करकंब गावच्या लेकींच्या अर्थिक योगदानतून ४००वृक्षांच वृक्षारोपण करून जोपासना करण्याच काम टीम करत आहे, तेंव्हा हे सामाजिक काम पाहून ॶॅड.संजय व्यवहारे यांनी स्वतः व्यवस्थापक कल्पेश क्षीरसागर साहेबांना सांगितले आणि या चांगल्या कामासाठी बॅंकेच्या वतीने काही सहकार्य करुया म्हटल्या बरोबर ५०टीशर्ट देण्याचे मान्य करुन या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच औचित्य साधून आज शुक्रवार दिनांक १२ऑगस्ट रोजी सकाळी ९:३०वा.वाटप करण्यात आले,यावेळी यापुढील काळात सर्वांना सोबत घेऊन स्वच्छता व पर्यावरण साठी भरपूर काम करु अस जागर टीमच्या वतीने सांगण्यात आले,यावेळी जागर टीम, करकंब गावच्या लेकीच झाड टीम,युगंधर आखाड्याचे तरुण बहुसंख्येने उपस्थित होते.