*आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित अभंगवाणीने सोलापूरकर रसिक मंत्रमुग्ध* *चितळे एक्सप्रेस आणि आइस एन स्पाइस सोलापूर यांचे अप्रतिम आयोजन*
करकंब/ प्रतिनिधी :-
*प्रतिवर्षाप्रमाणे आईस अन्ड स्पाइस आयोजित आषाढी एकादशीच्या निमित्ताने सोलापूर येथे ख्यातनाम कलाकारांच्या स्वरांनी सोलापूरकर रसिक मंत्रमुग्ध झाले.सुरुवातीला अभिषेक काळे, निखिल भालेराव,संगीता बिराजदार,मेघाताई, नागनाथ नागेशी यांनी वारकरी बीज मंत्र जय जय रामकृष्णहरी ने कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर दिंडी गजर पालखी सहित नृत्य सादर केले,त्यानंतर अनेक संतांच्या अभंगरचना गायल्या त्यामध्ये सुंदर ते ध्यान,देवाचिये द्वारी उभा क्षण भरी,काया ही पंढरी,तिर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल,धरीला पंढरीचा चोर,भाग्यदा लक्ष्मी बारंम्मा,निर्गुणाचे भेटी,कानडा राजा पंढरीचा,असे अप्रतिम अभंग सादरीकरण करत शेवटी माऊली माऊली गजराने नृत्यांचे सादरीकरण करत कार्यक्रमाची सांगता झाली,त्यांना तबला साथ ओंकार सुर्यवंशी,पखवाज साथ, ज्ञानेश्वर दुधाणे,टाळ अनिष सहस्त्रबुद्धे,यांनी केली तर अप्रतिम निवेदन अपर्णा सहस्त्रबुद्धे यांनी केले, मध्यांतरात आयोजक श्री नागेश सहस्त्रबुद्धे यांचे शुभहस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला,याचवेळी प्रिसिजन उद्योग समूहाचे अध्यक्ष यतीन शहा आणि सुहासिनी शहा यांचा (सोलापूर शहराचे ब्रॅण्ड अम्बेसिटर) आईस एन स्पाइस यांचे वतीने फेटा बांधून सत्कार करण्यात आला,आणि त्यांनी सोलापूर शहरासाठी करत असलेल्या कार्यांचा उल्लेख अनिस सहस्त्रबुद्धे यांनी केला.यानंतर कार्यक्रमासाठी त्यांनी स्पांन्सरसिप दिली त्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी हुतात्मा स्मृती मंदिर हाऊसफुल्ल गर्दीत सोलापूरकर रसिकांनी प्रतिसाद दिला,आईस एन स्पाइस सर्व कार्यकर्ते यांनी अधिक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला*