*जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या घरासमोरच बळीराजा शेतकरी संघटना करणार आंदोलन* *सोलापूर जिल्ह्यातून उजनी धरणावरून हजारो पदाधिकारी शेतकरी वर्ग , कार्यकर्ते, नागरिक जाणार* *जिल्हाध्यक्ष रामदास खराडे यांची माहिती*
करकंब/ प्रतिनिधी :-
उजनीचे पाणी इंदापूर तालुक्यात घेऊन जाण्याच्या निर्णयावर उद्धव बळीराजा शेतकरी संघटना आक्रमक आंदोलन एक जून पासून जलमंत्री जयंत पाटील यांच्या सांगली येथे निवासस्थानासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहे. तरी या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातून अनेक शेतकरी आंदोलनात सामील होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रामदास खराडे यांनी दिली आहे.
उजनी धरणातील 1.90 टीएमसी पाणी लाकडी निंबोणी योजनेसाठी राखीव ठेवले असून सदर योजना मंजूर झाली आहे. विधानसभेतील सर्व आमदारांना पत्र देऊन त्यांची संमती घेतली असल्याचा दावा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास खराडे यांनी केला आहे.याच गोष्टीला विरोध करण्यासाठी सांगली येते जलसंपदा मंत्र्यांच्या घरासमोर एक जून पासून बेमुदत आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.तरी यावेळीसोलापुरातून अनेक शेतकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.