पंढरीत फिटनेस एरोबीक्स शिबीर संपंन्न
पंढरीत फिटनेस एरोबीक्स शिबीर संपंन्
पंढरपूर /प्रतिनिधी
सोलापूर शहर व जिल्हा स्पोर्ट्स एरोबीक्स व फिटनेस असोसिएशन व महाराष्ट्र स्पोर्ट्स एरोबीक्स व फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने पंढरपूर येथील पंतनगर फिटनेस सेंटर मध्ये राज्यस्तरीय फिटनेस एरोबीक्स शिबीर नुकतेच पार पडले.
फिटनेस एरोबीक्स म्हणजे संगिताच्या तालावर,तालबध्द नियमानुसार केलेला व्यायाम प्रकार असून हा खेळ चार प्रकारामध्ये शिकविला जातो.स्पोर्ट्स एरोबीक्स,फिटनेस एरोबीक्स,स्टेप एरोबीक्स व हिप हॉप एरोबीक्स या चार प्रकारात शिकविला जातो.
एरोबीक्स हा खेळ जागतिक पातळीवर खेळ म्हणून १९९६ पासून खेळला जात असून एरोबीक्स हा खेळ भारतात २००१ पासून राष्ट्रीय महासंघाकडून सुरु करण्यात आलेला आहे.
एरोबीक्स या खेळामुळे शरीराचे वजन कमी होतेआॕक्सिजनचा पुरवठा नियमित होतो,ह्रदयाची स्पंदने व्यवस्थित राहण्यासाठी मदत होते तसेच इतर सर्व आजारापासून सुटका होत असल्याचे जिल्हा संघटनेच्या अध्यक्षा चित्रा गायकवाड यांनी सांगितले.
सदर खेळाला भारतात सी.बी.एस.ई.बोर्डाला व महाराष्ट्र राज्य बोर्डाला शालेय महासंघाची मान्यता असून एरोबीक्स खेळाडुंना शासनाच्या सर्व सवलतींचा लाभ मिळतो.या राज्यस्तरीय शिबीरास राष्ट्रीय एरोबीक्स संघटनेचे सचिव संतोष खैरनार यांचे मार्गदर्शन लाभले तर आंतरराष्टीय प्रशिक्षक सुरैय्या खैरनार यांचे सखोल व तांत्रिक मार्गदर्शनाखाली हे शिबीर पंढरपूर येथे पार पडले. या राज्यस्तरीय शिबीरात सोलापूर जिल्ह्यातून बावन्न कोचेसनी सहभाग घेतला होता.
या शिबीरात एरोबीक्स कोच म्हणून विशाल दळवी,संग्राम गायकवाड यांनी घवघवीत यश संपादन केले. याप्रसंगी जिल्हा संघटनेचे मार्गदर्शक उमेश परिचारक यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये एरोबीक्स खेळाचा प्रसार करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर जिल्हा संघटनेचे अध्यक्षा चित्रा गायकवाड व सचिव सुधाकर गायकवाड यांनी यशस्वी खेळाडुंचे अभिनंदन केले.