*करकंब ग्रामपंचायत विरोधात विरोधकांनी फिरसे उपसले उपोषणाचे हत्यार....*.!  *विरोधी पक्ष नेते राहुल पुरवत व 7 सदस्य आक्रमक*  *सत्ताधार्‍यांचे धाबे दणाणार..*.

*करकंब ग्रामपंचायत विरोधात विरोधकांनी फिरसे उपसले उपोषणाचे हत्यार....*.!  *विरोधी पक्ष नेते राहुल पुरवत व 7 सदस्य आक्रमक*  *सत्ताधार्‍यांचे धाबे दणाणार..*.

 करकंब /प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठी 17 सदस्य संख्या असलेली करकंब ग्रामपंचायत ही सोलापूर जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला सुद्धा परिचयाची आहे. महाराष्ट्रात सर्वात आधी शंभर टक्के डिजिटल मुक्त गाव करण्याचा संकल्प व ग्रामसभेचा ठराव करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठराव याच ग्रामपंचायतच्या माध्यमातून केला, त्यातच सर्वात मोठी ग्रामपंचायत सर्वात मोठे गाव असूनही महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार प्राप्त असलेल्या या गावाला सध्या सत्ताधारी आणि विरोधक यामध्ये प्रचंड धमासान सुरू आहे. सत्ताधारी मंडळीकडे 9 जन तर विरोधक विरोधी पक्ष नेते राहुल पुरवत यांचे बरोबर ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य मारुती देशमुख शिवसेना उपतालुका प्रमुख संतोष धोत्रे, बापू शिंदे, पांडुरंग नगरकर व इतर सदस्य आहेत. सत्ताधारी आणि विरोधक हे सतत एकमेकांना धारेवर धरत असतात. त्यामुळेच विरोधी पक्षनेते राहुल पुरवत यांनी करकब ग्रामपंचायत विरोधात विविध माहिती मिळण्याबाबत पंढरपूर तहसील कार्यालय समोर दिनांक १३/७/२०२१ रोजी आमरण उपोषण केले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, विस्ताराधिकारी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन दिनांक १६/७/२०२१ अखेर सर्व माहिती देण्यासंदर्भात लेखी आश्वासन देऊन उपोषण स्थगित करण्यात लावले होते. अधिकाऱ्यांनीच यास केराची टोपली दाखवल्याने विरोधकांनी करकब ग्रामपंचायतच्या कारभाराविषयी लेखी निवेदन देऊन पंढरपूर तहसील कार्यालय येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा दिल्याने करकब व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.