*जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा* *माढाचे आ. अभिजित पाटील यांनी मांडले लोकहिताचे अनेक प्रश्न* *माढा शहराच्या पाणी प्रश्नाला पहिल्याच दिवशी घातला हात
पंढरपूर /प्रतिनिधी
माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये , मागील 30 वर्षाची सत्ता उलटून टाकत मतदार संघात परिवर्तन घडवले आहे. चेअरमन अभिजीत पाटील यांना आमदार केल्याची कसर न राखण्यासाठीच आ. पाटील यांनीही नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आक्रमकपणे विविध प्रश्न मांडत त्याची सोडवणूक होण्याच्या दृष्ठीने तयारी ठेवली आहे.
माढा पंढरपूर विधानसभा मतदार संघातून विकासाचे व्हिजन असणारे लोकप्रतिनिधी पाठविण्याचे काम या पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी केले आहे. त्यामुळेच आ.अभिजीत पाटील यांनी केवळ विकास आणि विकास यासाठीच आपली आमदारकी पणाला लावण्याचा निर्णय घेतला आहे.
बुधवारी झालेल्या नागपूर येथील पहिल्याच भाषणात अगदी मुद्देसूरपणे आपल्या मतदार संघातील विकासासह राज्यातील मराठा, धनगर, लिंगायत, महादेव कोळी, मुस्लिम या विविध जातीच्या आरक्षण संदर्भात योग्य मार्ग काढण्यासाठी राज्यात जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे.
मराठा आरक्षण प्रश्नाचे मागील अनेक दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आंदोलन केले जात आहे. आगामी 25 डिसेंबर रोजी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. परंतु या आंदोलनाच्या इशाराकडे सरकारने गांभीर्याने पहिले नसून अभिभाषणात त्याबाबतीत कसलीही भूमिका मांडली नसल्याने आ. अभिजित पाटील यांनी सरकारवर थेट नाराजी व्यक्त केली आहे. यामुळेच आ. अभिजित पाटील यांच्यामुळे सरकारला आरक्षण प्रश्नातील होणाऱ्या आंदोलन प्रश्नांची आठवण करून देण्याचे काम खुद्द आ. अभिजित पाटील यांनी केले आहे. यामुळेच मराठा समाजाला दिलेल्या शब्द पाळण्यासाठी आ. अभिजित पाटील यांचा पहिल्यापासूनच पाठपुरावा सुरु झाला असल्याचे स्पष्ट दिसलें आहे.
माढा मतदार संघातील माढा शहरमध्ये दहा दिवसातून पाणी मिळते. याबाबत उजनी धरण या माढा तालुक्यात असूनही अशी वाईट अवस्था का? असा प्रश्न मांडत हा पाणी प्रश्न सोंडविण्याबाबत मागणी केली आहे.
सरकारने शहरा बरोबरच ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी पावले उचलली पाहिजे. याकरिता आपल्या मतदारसंघात असलेल्या मेंढापूर आणि मोडनिंब येथील एम आय डी सी ला लवकरात लवकर मान्यता दिल्यास या भागाचा मोठा विकास होईल आसेही सांगितले.यासह विविध प्रश्नावर आ. अभिजित पाटील यांनी आवाज उठवीत आपण माढा मतदार संघाला विकासाच्या दिशेने घेवून जाऊ शकतो हे दाखवून दिले आहे.
*चौकट*
*एम एस पी वाढविण्यासाठी पाठपुरावा व्हावा*
➖➖➖➖
आपल्या महाराष्ट्र राज्यात साखर कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. याच उद्योगावर राज्यातील मोठं आर्थिक गणित अवलंबून आहे. यासाठी हा साखर उद्योग चालविणे गरजेचे आहे. ऊस उत्पादक शेतकरी यांना लाभ होण्यासाठी साखरेचे भाव वाढविणे आवश्यक आहेत. तरच उसाला भाव वाढ देणे श्यक्य असते. यासाठी आपल्या राज्य सरकारकडून केंद्र सरकारला एम एस पी वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याची मागणी माढाचे नूतन आमदार अभिजित पाटील यांनी अधिवेशनात केली आहे.