*आ. अभिजीत पाटील यांचेकडून माढा बरोबरच पंढरीच्या विकासाचाही  पाठपुरावा*  *पंढरपूरच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवीत, अधिवेशनात केली निधीसाठी सरकारला विनंती* 

*आ. अभिजीत पाटील यांचेकडून माढा बरोबरच पंढरीच्या विकासाचाही  पाठपुरावा*    *पंढरपूरच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवीत, अधिवेशनात केली निधीसाठी सरकारला विनंती* 

पंढरपूर/प्रतिनीधी 

माढा -पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय आमदार अभिजीत पाटील यानी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आपल्या माढा विधानसभा मतदार संघातील विकासा बरोबरच आपल्या पंढरपुर शहराच्या विकासासाठी सरकारकडे निधी मिळावा यासाठी तळमळीने मागणी केली आहे.
माढा -पंढरपूर  मतदार संघातील अनेक प्रश्न सभागृहापुढे मांडले. त्यानंतर सकाळी ९:३० पासून येऊन अक्षरशः जेवण न करता रात्री ९:०० पर्यत थांबून कळकळीनं प्रश्नांची मांडणी केली. यामध्ये टेंभुर्णी नगरपंचायत संदर्भात अंतिम अधिसूचना काढण्यात यावी. 
माढा नगरपंचायत मधील जिल्हा परिषदेच्या जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स साठी निधी उपलब्ध करून दिल्यास या ठिकाणी व्यवसाय सुरू होऊ शकतील. तसेच शाळेसाठी कंपाउंड वॉल करणे.
     माढा तहसील कार्यालयाच्या फर्निचर साठी निधी उपलब्ध करून देणे.
माढा शहरातील प्ले ग्राउंड गार्डनसाठी निधी उपलब्ध करून देणे.माढा शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देणे. नाट्यगृह, एसटीपी प्लांट, माढेश्वरी देवी तीर्थक्षेत्रासाठी निधी उपलब्ध करून देणे.
    पंढरपूर नगरपालिका मधील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांसाठी नागरिकांनी पैसे भरले असून २०२१ पासून काम बंद आहे, त्याबाबत तात्काळ सरकारने दखल घेऊन रेंगाळलेल्या या ज्वलंत प्रश्नांना न्याय देवून तत्काळ कार्यवाही व्हावी.पंढरपूर नाट्यगृह बांधकामातील भ्रष्टाचाराविषयी सखोल चौकशी व्हावी.महाराष्ट्रातून तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूर येथे वारकरी येतात श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागेत स्नान करतात परंतू शहरातील सोडण्यात येणारे घाण पाणी चंद्रभागेच्या नदी पात्रात जाते. या पाण्यावर ट्रीटमेंट करून हे पाणी सोडले जाणे आवश्यक आहे. पंढरपूर येथे भाविकांसाठी १००० खटांचे रुग्णालय सुरू करण्याबाबत जी.आर निघाला असून त्याला मंजुरी देऊन जागा उपलब्ध करून देणे. तसेच मेडिकल महाविद्यालयास परवानगी मिळावी..

  टेंभुर्णी येथे ग्रामीण रुग्णालयात उपकरणांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा..
 टेंभुर्णी, करकंब आणि मोडनिंब येथे नगरपंचायत व्हावी. पंढरपूर तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं परंतु लहान मुलांना खेळण्यासाठी (गार्डन) बागेसाठी निधी मिळून देखील कामाला सुरूवात झाली नाही..पंढरपूर येथील यमाई तलाव येथे लेझर शो साठी निधी उपलब्ध करून द्यावा.आशा अनेक प्रश्नाबाबत आवाज उठविला गेला आहे.