*प्रदेश सरचिटणीस यांची प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट* *फाटे परिवाराच्या वतीने यथोचित सन्मान*
पंढरपूर/प्रतिनीधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश, सरचिटणीस रवींद्र पवार यांनी राष्ट्रवादी उद्योग व व्यापारी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली असता फाटे परिवाराचे वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
राष्ट्रवादी मुंबई कार्यालयाचे प्रमुख रवींद्र पवार यांनी शनिवारी सहकुटुंब सहपरिवार येऊन मायबाप विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले.यावेळी पवार कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
आमचे पक्षाचे नेते रवींद्र पवार यांनी सहकुटुंब माझ्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिली. यामुळे आपण आमच्या परिवाराचे वतीने स्वागत सत्कार करत संपूर्ण पवार परिवारास पुढील सुखकर प्रवासासाठी शुभेच्या दिल्या असल्याचेही नागेशदादा फाटे यांनी सांगितले आहे.