*नागेशदादा फाटे यांचेकडून नूतन खा. प्रणितीताई शिंदे यांचे स्वागत**माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनाही वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्या*
पंढरपूर/प्रतिनीधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश दादा फाटे यांच्याकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार प्रणितीताई शिंदे यांचे पंढरी नगरीत स्वागत करण्यात आले. तसेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
नागेशदादा फाटे हे समाजकारणातून राजकारणात आले असता, त्यांना सुरुवातीच्या कालावधीमध्ये काँग्रेस सेवादलाचे पंढरपूर तालुक्याचे अध्यक्षपद देण्यात आले होते. या पक्षामध्ये चांगल्या पद्धतीचे काम केले असल्याचे पाहून, काँग्रेसच्या वरिष्ठ नेतेमंडळी कडून नागेश दादा फाटे यांच्यावर सोलापूर जिल्हा काँग्रेस सेवादलाची जबाबदारी देण्यात आली होती. कालांतराने नागेशदादा फाटे यांनी खासदार शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष पद बहाल करण्यात आले होते.

मध्यंतरीच्या राष्ट्रवादीच्या फटाफुटीमध्ये नागेश दादा फाटे यांनी खासदार शरदचंद्र पवार यांच्याच नेतृत्वाखाली काम करण्याची ठरवले होते. त्यावेळीही खासदार शरदचंद्र पवार यांचे आदेशाने प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी नागेशदादा फाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आले आहे. वरील सर्व पदावर काम करीत असताना नागेश दादा फाटे यांनी संघटन मजबूत केले आहे. यामुळे नागेशदादा फाटे यांचे राजकारणात राज्यस्तरावरील स्थान बळकट झाले आहे. हा पंढरपूर तालुक्याच्या दृष्टीने मोठा बहुमान असल्याचे दिसत आहे.
खासदार प्रणिती शिंदे यांच्या सत्कार प्रसंगी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक योगेश ताड आणि राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभागाचे कार्यकर्ते उपस्थित होते.