*दगडूशेठ घोडके यांच्या उमेदवारीने पंढरीत जोरदार चर्चा* *माजी नगराध्यक्ष असल्याने  उमेदवारीला आले महत्व* *यापूर्वीही पंढरपूर लोकसभेला मिळाली होती लाखाच्या पटीत मते* पंढरपूर/महलींग दुधाळे

*दगडूशेठ घोडके यांच्या उमेदवारीने पंढरीत जोरदार चर्चा*  *माजी नगराध्यक्ष असल्याने  उमेदवारीला आले महत्व*  *यापूर्वीही पंढरपूर लोकसभेला मिळाली होती लाखाच्या पटीत मते*  पंढरपूर/महलींग दुधाळे

पंढरपूर/महलींग दुधाळ
 
पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष दगडूशेठ घोडके यांनी सोलापूर लोकसभा राखीव मतदार संघातून आपली अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. यामुळे घोडके यांच्या उमेदवारीला महत्व असून याची पंढरपूरसह सोलापूर मतदार संघात चर्चा रंगू लागली आहे.
     दगडुशेठ घोडके यांनी पंढरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून आपली कारकीर्द गाजवली आहे. घोडके यांनी मागील १९९९ ची पंढरपूर राखीव मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढविली होती. त्यावेळी दगडूशेठ घोडके यांना लाखाच्या पटीत मतदान पडले होते.
   घोडके यांनी ठेकेदारी व्यवसायातून आपले नाव वाढविले होते. ते वडार समाजाचे नेते म्हणून परिचित आहेत. त्यांना मानणारा वडार समाजच नव्हे तर इतर समाजही मोठ्या प्रमाणात आहे. पंढरपूर आणि मतदार संघातील वडार समाजाचे मतदान मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला फारच मोठे महत्व प्राप्त झाले आहे.
    अनेक गोरगरीब जनतेच्या अडचणीला धावून जाणारे नेते म्हणून घोडके यांची नावलौकिक आहे. त्यामुळे अनेक गोरगरीब जनता पाठीशी राहणार आहेत.
         माजी आमदार    स्व. सुधाकरपंत परिचारक, माजी उपमुखयमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचेसह अनेक दिग्गज नेत्यांबरोबर काम केले आहे. त्यामुळे दगडूशेठ घोडके यांच्या उमेदवारीस एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.