*पिराची कुरोली येथील अपघातात दोन लहान मुलांचा बळी*

*पिराची कुरोली येथील अपघातात दोन लहान मुलांचा बळी*

करकंब /प्रतिनिधी:

फलटण येथून मुलांना घरी घेऊन येत असलेल्या मयूर औदुंबर मोरे यांचा चिंचणी फाटा पिराची कुरोली ते पंढरपूर नातेपुते रोडवर अपघात झाला सदर अपघातामध्ये रुद्र मयूर मोरे वय 6 हा मुलगा जागीच ठार झाला व त्रिशा मयूर मोरे व मयूर औदुंबर मोरे हे गंभीर जखमी झाले मयूर मोरे या मुलीचा दोन दिवसानंतर सिविल हॉस्पिटल सोलापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत सविस्तर वृत्त असे की , मयूर औदुंबर मोरे बावी तालुका माढा येथील रहिवासी असून फलटण येथे  नोकरी करीत आहेत पुणे येथे दुसऱ्या जॉब साठी जायचे असल्यामुळे आपल्या दोन लहान मुलांना आपल्या मूळ गावी बावी तालुका माढा येथे आजीजवळ सोडण्यासाठी दुचाकीवर घेऊन येत होते येत असताना अचानक रोडवर येत असलेल्या ट्रॅक्टरची जोराची धडक बसल्याने रुद्र मोरे व त्रिशा मोरे रोडवर उडून पडली व त्यामध्ये रुद्र मोरे या बालकाचा जागीच मृत्यू झाला तर त्रिशा मोरे हिचा उपचारादरम्यान सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे मृत्यू झाला गंभीर स्वरूपात जखमी झालेले मयूर मोरे सध्या सोलापूर येथे उपचार घेत आहेत. अपघातानंतर इनामदार हॉस्पिटल अकलूज येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले व तेथून जखमींना सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले दोन्ही लहान मुलांचा अपघातात मृत्यू झाल्याने बावी आणि परिसरामध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे .नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे सदर अपघात चिंचणी फाटा पिराची कुरोली शिवारात झाल्यामुळे पंढरपुर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सुरेश जाधव व सुरवसे पुढील तपास करीत आहेत ट्रॅक्टर मालकाचे विरोधात गुन्हा पंढरपुर ग्रामीण पोलीस स्टेशनात दाखल करण्यात आला आहे. सदर मुले ही भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सिंधुबाई औदुंबर मोरे यांचे नातू होते.