*डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी जमा झालेले शालेय साहित्य गौतम विद्यालयातील विद्यार्थ्यांना केले वाटप*
पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर येथील भिमशक्ती सांस्कृतिक बहुद्देशीय सामाजिक संस्था व रमामाता महीला मंडळ संतपेठ सांगोला रोड यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी फुले हार नारळ न आणता, एक वही व पेन घेऊन विनम्र अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यावेळी जे शालेय साहित्य आणुन अभिवादन करण्यासाठी आले, ते साहित्य जमा करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या शाळेत गौतम विद्यालय येथील विद्यार्थी यांना वाटप करण्यात आले.
सिध्दार्थ सरवदे यांच्या हास्ते वरील शालेय साहित्याचे वाटप वकरण्यात आले, त्यावेळी गौतम विद्यालय येथील सर्व शिक्षक व मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोषजी सर्वगोड, किशोर खिलारे अॅड, दत्ता चंदनशिवे, लखन लामकाने, लखन सर्वगोड, सिध्दार्थ गावकरे, अमित खिलारे , बापू भोसले, रशिद मुलाणी ताजुद्दीन सय्यद, आधारस्तंभ राहुलदादा मोरे, सुमित पवार, रविंद्र सर्वगोड, शिवाजी चंदनशिवे, रोहन खरात, सचिन भोरकडे,दिपक बनसोडे, हे उपस्थित होते.